< स्तोत्रसंहिता 79 >
1 १ आसाफाचे स्तोत्र हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.
アサフの歌 神よ、もろもろの異邦人はあなたの嗣業の地を侵し、あなたの聖なる宮をけがし、エルサレムを荒塚としました。
2 २ त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.
彼らはあなたのしもべのしかばねを空の鳥に与えてえさとし、あなたの聖徒の肉を地の獣に与え、
3 ३ त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.
その血をエルサレムのまわりに水のように流し、これを葬る人がありませんでした。
4 ४ आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
われらは隣り人にそしられ、まわりの人々に侮られ、あざけられる者となりました。
5 ५ हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील?
主よ、いつまでなのですか。とこしえにお怒りになられるのですか。あなたのねたみは火のように燃えるのですか。
6 ६ जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत.
どうか、あなたを知らない異邦人と、あなたの名を呼ばない国々の上にあなたの怒りを注いでください。
7 ७ कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
彼らはヤコブを滅ぼし、そのすみかを荒したからです。
8 ८ आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
われらの先祖たちの不義をみこころにとめられず、あわれみをもって、すみやかにわれらを迎えてください。われらは、はなはだしく低くされたからです。
9 ९ हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
われらの救の神よ、み名の栄光のためにわれらを助け、み名のためにわれらを救い、われらの罪をおゆるしください。
10 १० ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.
どうして異邦人は言うのでしょう、「彼らの神はどこにいるのか」と。あなたのしもべらの流された血の報いをわれらのまのあたりになして、異邦人に知らせてください。
11 ११ कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.
捕われ人の嘆きをあなたのみ前にいたらせ、あなたの大いなる力により、死に定められた者を守りながらえさせてください。
12 १२ हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल.
主よ、われらの隣り人があなたをそしったそしりを七倍にして彼らのふところに報い返してください。
13 १३ मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.
そうすれば、あなたの民、あなたの牧の羊は、とこしえにあなたに感謝し、世々あなたをほめたたえるでしょう。