< स्तोत्रसंहिता 79 >

1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.
ああ神よもろもろの異邦人はなんぢの嗣業の地ををかし なんぢの聖宮をけがしヱルサレムをこぼちて礫堆となし
2 त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.
なんぢの僕のしかばねをそらの鳥に與へて餌となし なんぢの聖徒の肉を地のけものにあたへ
3 त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.
その血をヱルサレムのめぐりに水のごとく流したりされど之をはうむる人なし
4 आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
われらは隣人にそしられ四周のひとびとに侮られ嘲けらるるものとなれり
5 हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील?
ヱホバよ斯て幾何時をへたまふや 汝とこしへに怒たまふや なんぢのねたみは火のごとく燃るか
6 जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत.
願くはなんぢを識ざることくにびと聖名をよばざるもろもろの國のうへに烈怒をそそぎたまへ
7 कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
かれらはヤコブを呑その住處をあらしたればなり
8 आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
われらにむかひて先祖のよこしまなるわざを記念したまふなかれ願くはなんぢの憐憫をもて速かにわれらを迎へたまへ われらは貶されて甚だしく卑くなりたればなり
9 हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
われらのすくひの神よ名のえいくわうのために我儕をたすけ名のためにわれらを救ひ われらの罪をのぞきたまへ
10 १० ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.
いかなれば異邦人はいふ かれらの神はいづくにありやと 願くはなんぢの僕等がながされし血の報をわれらの目前になして異邦人にしらしめたまへ
11 ११ कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.
ねがはくは汝のみまへにとらはれびとの嘆息のとどかんことを なんぢの大なる能力により死にさだめられし者をまもりて存へしめたまへ
12 १२ हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल.
主よわれらの隣人のなんぢをそしりたる謗を七倍ましてその懐にむくいかへしたまへ
13 १३ मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.
然ばわれらなんぢの民なんぢの草苑のひつじは永遠になんぢに感謝しその頌辭を世々あらはさん

< स्तोत्रसंहिता 79 >