< स्तोत्रसंहिता 78 >
1 १ आसाफाचे स्तोत्र अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
En læresalme av Asaf. Lytt, mitt folk, til min lære, bøi eders ører til min munns ord!
2 २ मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
Jeg vil oplate min munn med tankesprog, jeg vil la utstrømme gåtefulle ord fra fordums tid.
3 ३ ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
Det vi har hørt og vet, og det våre fedre har fortalt oss,
4 ४ त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
det vil vi ikke dølge for deres barn, men for den kommende slekt fortelle Herrens pris og hans styrke og de undergjerninger som han har gjort.
5 ५ कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
Han har reist et vidnesbyrd i Jakob og satt en lov i Israel, som han bød våre fedre å kunngjøre sine barn,
6 ६ त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
forat den kommende slekt, de barn som skulde fødes, kunde kjenne dem, kunde stå frem og fortelle dem for sine barn
7 ७ मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
og sette sitt håp til Gud og ikke glemme Guds gjerninger, men holde hans bud
8 ८ तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.
og ikke være som deres fedre, en opsetsig og gjenstridig slekt, en slekt som ikke gjorde sitt hjerte fast, og hvis ånd ikke var trofast mot Gud.
9 ९ एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती, परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली.
Efra'ims barn, de rustede bueskyttere, vendte om på stridens dag.
10 १० त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले.
De holdt ikke Guds pakt og vilde ikke vandre i hans lov,
11 ११ ते त्याची कृत्ये व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.
og de glemte hans store gjerninger og de under som han hadde latt dem se.
12 १२ मिसर देशातल्या सोअन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.
For deres fedres øine hadde han gjort under i Egyptens land, på Soans mark.
13 १३ त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले.
Han kløvde havet og lot dem gå gjennem det og lot vannet stå som en dynge.
14 १४ तो त्यांना दिवसा मेघ व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे.
Og han ledet dem ved skyen om dagen og hele natten ved ildens lys.
15 १५ त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.
Han kløvde klipper i ørkenen og gav dem å drikke som av store vanndyp.
16 १६ त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.
Og han lot bekker gå ut av klippen og vann flyte ned som strømmer.
17 १७ तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. रानात परात्पराविरूद्ध बंड केले.
Men de blev ennu ved å synde mot ham, å være gjenstridige mot den Høieste i ørkenen.
18 १८ नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.
Og de fristet Gud i sitt hjerte, så de krevde mat efter sin lyst.
19 १९ ते देवाविरूद्ध बोलले, ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?
Og de talte mot Gud, de sa: Kan vel Gud dekke bord i ørkenen?
20 २० पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?”
Se, han har slått klippen så det fløt ut vann, og bekker strømmet over; mon han også kan gi brød, eller kan han komme med kjøtt til sitt folk?
21 २१ जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,
Derfor, da Herren hørte det, harmedes han, og ild optendtes mot Jakob, og vrede reiste sig mot Israel,
22 २२ कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.
fordi de ikke trodde på Gud og ikke stolte på hans frelse.
23 २३ तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली, आणि आभाळाचे दरवाजे उघडले.
Og han gav skyene der oppe befaling og åpnet himmelens porter.
24 २४ खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला, आणि त्यांना आकाशातून धान्य दिले.
Og han lot manna regne over dem til føde og gav dem himmelkorn.
25 २५ देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले.
Englebrød åt enhver; han sendte dem næring til mette.
26 २६ त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.
Han lot østenvinden fare ut i himmelen og førte sønnenvinden frem ved sin styrke.
27 २७ त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला.
Og han lot kjøtt regne ned over dem som støv og vingede fugler som havets sand,
28 २८ ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले, त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले.
og han lot dem falle ned midt i deres leir, rundt omkring deres boliger.
29 २९ मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले.
Og de åt og blev såre mette, og det de lystet efter, gav han dem.
30 ३० पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते.
De hadde ennu ikke latt fare det de lystet efter, ennu var deres mat i deres munn,
31 ३१ त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.
da reiste Guds vrede sig mot dem, og han herjet blandt deres kraftfulle menn, og Israels unge menn slo han ned.
32 ३२ इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
Med alt dette syndet de enda og trodde ikke på hans undergjerninger.
33 ३३ म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले; त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले.
Derfor lot han deres dager svinne bort i tomhet og deres år i forskrekkelse.
34 ३४ जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.
Når han herjet blandt dem, da spurte de efter ham og vendte om og søkte Gud
35 ३५ देव आमचा खडक आहे, आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली.
og kom i hu at Gud var deres klippe, og den høieste Gud deres gjenløser.
36 ३६ पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.
Men de smigret for ham med sin munn og løi for ham med sin tunge.
37 ३७ कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.
Og deres hjerte hang ikke fast ved ham, og de var ikke tro mot hans pakt.
38 ३८ परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.
Men han, han er miskunnelig, han tilgir misgjerning og forderver ikke; mange ganger lot han sin vrede vende om og lot ikke all sin harme bryte frem.
39 ३९ ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.
Og han kom i hu at de var kjød, et åndepust som farer avsted og ikke kommer tilbake.
40 ४० त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु: खी केले.
Hvor titt var de ikke gjenstridige mot ham i ørkenen, gjorde ham sorg på de øde steder!
41 ४१ पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु: खविले.
Og de fristet Gud på ny og krenket Israels Hellige.
42 ४२ त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
De kom ikke hans hånd i hu den dag han forløste dem fra fienden,
43 ४३ मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.
han som gjorde sine tegn i Egypten og sine under på Soans mark.
44 ४४ त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.
Han gjorde deres elver til blod, og sine rinnende vann kunde de ikke drikke.
45 ४५ त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले, आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला.
Han sendte imot dem fluesvermer som fortærte dem, og frosk som fordervet dem.
46 ४६ त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले.
Og han gav gnageren deres grøde og gresshoppen deres høst.
47 ४७ त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला.
Han slo deres vintrær ned med hagl og deres morbærtrær med haglstener.
48 ४८ त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली.
Og han overgav deres fe til haglet og deres hjorder til ildsluer.
49 ४९ त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.
Han slapp sin brennende vrede løs mot dem, harme og forbitrelse og trengsel, en sending av ulykkes-bud.
50 ५० त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला; त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.
Han brøt vei for sin vrede, sparte ikke deres sjel for døden, overgav deres liv til pesten.
51 ५१ त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.
Og han slo alle førstefødte i Egypten, styrkens førstegrøde i Kams telter.
52 ५२ त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.
Og han lot sitt folk bryte op som en fåreflokk og førte dem som en hjord i ørkenen.
53 ५३ त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले, पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले.
Og han ledet dem tryggelig, og de fryktet ikke, men havet skjulte deres fiender.
54 ५४ आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.
Og han førte dem til sitt hellige landemerke, til det berg hans høire hånd hadde vunnet.
55 ५५ त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.
Og han drev hedningene ut for deres åsyn og lot deres land tilfalle dem som arvedel og lot Israels stammer bo i deres telter.
56 ५६ तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
Men de fristet Gud, den Høieste, og var gjenstridige mot ham, og de aktet ikke på hans vidnesbyrd.
57 ५७ ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.
De vek av og var troløse, som deres fedre, de vendte om, likesom en bue som svikter.
58 ५८ कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.
Og de vakte hans harme med sine offerhauger og gjorde ham nidkjær med sine utskårne billeder.
59 ५९ जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.
Gud hørte det og blev vred, og han blev såre kjed av Israel.
60 ६० त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
Og han forlot sin bolig i Silo, det telt han hadde opslått blandt menneskene.
61 ६१ त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.
Og han overgav sin styrke til fangenskap og sin herlighet i fiendens hånd.
62 ६२ त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला.
Og han overgav sitt folk til sverdet og harmedes på sin arv.
63 ६३ अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.
Ild fortærte dets unge menn, og dets jomfruer fikk ingen brudesang.
64 ६४ त्यांचे याजक तलवारीने पडले, आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
Dets prester falt for sverdet, og dets enker holdt ikke klagemål.
65 ६५ मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
Da våknet Herren som en sovende, som en helt som jubler av vin.
66 ६६ त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
Og han slo sine motstandere tilbake, påførte dem en evig skam.
67 ६७ त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
Og han forkastet Josefs telt og utvalgte ikke Efra'ims stamme,
68 ६८ त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
men han utvalgte Juda stamme, Sions berg som han elsket.
69 ६९ उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
Og han bygget sin helligdom lik høie fjell, lik jorden, som han har grunnfestet for evig tid.
70 ७० त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
Og han utvalgte David, sin tjener, og tok ham fra fårehegnene;
71 ७१ आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.
fra de melkende får som han gikk bakefter, hentet han ham til å vokte Jakob, sitt folk, og Israel, sin arv.
72 ७२ दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
Og han voktet dem efter sitt hjertes opriktighet og ledet dem med sin forstandige hånd.