< स्तोत्रसंहिता 77 >
1 १ आसाफाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
For the leader. On Jeduthun. Of Asaph, a psalm. Loudly will I lift my cry to God, loudly to God, so he hears to me.
2 २ माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
In the day of my trouble I seek the Lord; in the night I lift my hands in prayer, refusing all comfort.
3 ३ मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
When I think of God, I moan; when I muse, my spirit is faint. (Selah)
4 ४ तू माझे डोळे उघडे ठेवतोस; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
When you hold my eyes awake, and I am restless and speechless,
5 ५ मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.
I think of the days of old, call to mind distant years.
6 ६ रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
I commune with my heart in the night, I muse with inquiring spirit.
7 ७ प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
“Will the Lord cast us off forever, will he be gracious no more?
8 ८ त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
Has his love vanished forever? Is his faithfulness utterly gone?
9 ९ देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
Has God forgotten to be gracious, or in anger withheld his compassion?” (Selah)
10 १० मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
Then I said, “This it is that grieves me, that the hand of the Most High has changed.”
11 ११ पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
I will think of the deeds of the Lord, and remember your wonders of old.
12 १२ मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
I will muse on all you have wrought, and meditate on your deeds.
13 १३ हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
Then your way, O God, was majestic: what God was great as our God?
14 १४ अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
You were a God who did marvels, you did show your power to the world
15 १५ याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
by your arm you rescued your people, the children of Jacob and Joseph. (Selah)
16 १६ हे देवा, जलाने तुला पाहिले, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.
The waters saw you, O God. The waters saw you and shivered; to their depths they trembled.
17 १७ मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.
Clouds poured torrents of water, thunder rolled in the sky, your arrows sped to and fro.
18 १८ तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
Loud was the roll of your thunder, lightnings lit up the world. Earth quaked and trembled.
19 १९ समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
In your way, Lord, through the sea, in your path through the mighty waters, your footsteps were all unseen.
20 २० मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.
You did guide your folk like a flock by the hand of Moses and Aaron.