< स्तोत्रसंहिता 76 >

1 मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
Au maître chantre. Avec instruments à cordes. Cantique d'Asaph. Dieu est connu en Juda, son nom est grand en Israël;
2 शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
et sa demeure est en Salem, et sa résidence en Sion.
3 तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
Là Il a brisé les foudres de l'arc, le bouclier, et l'épée, et les armes de guerre. (Pause)
4 तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
Tu es plus brillante, plus magnifique que les montagnes des ravisseurs!
5 जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
Ils furent dépouillés les héros courageux, et ils s'endormirent de leur sommeil; et tous les braves ne retrouvèrent plus leurs bras.
6 हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
A ta menace, Dieu de Jacob, et chars et chevaux furent engourdis.
7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
Tu es formidable; qui peut tenir contre toi, dès que tu t'irrites?
8 तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि: शब्द झाली.
Des cieux tu promulguas ta sentence; la terre fut en effroi, et se calma,
9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
lorsque Dieu se leva pour juger, pour porter secours à tous les affligés de la terre. (Pause)
10 १० खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
Oui, la fureur de l'homme te glorifie; tu t'entoures de ceux qui survivent à ta colère.
11 ११ परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
Faites et acquittez des vœux à l'Éternel, votre Dieu! Que de tous Ses alentours on apporte des dons au Dieu terrible!
12 १२ तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.
Il abat l'orgueil des princes, Il est redoutable aux rois de la terre.

< स्तोत्रसंहिता 76 >