< स्तोत्रसंहिता 75 >
1 १ आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
ऐ ख़ुदा, हम तेरा शुक्र करते हैं, हम तेरा शुक्र करते हैं; क्यूँकि तेरा नाम नज़दीक है, लोग तेरे 'अजीब कामों का ज़िक्र करते हैं।
2 २ नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
जब मेरा मु'अय्यन वक़्त आएगा, तो मैं रास्ती से 'अदालत करूँगा।
3 ३ जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
ज़मीन और उसके सब बाशिन्दे गुदाज़ हो गए हैं, मैंने उसके सुतूनों को क़ाईम कर दिया।
4 ४ मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
मैंने मग़रूरों से कहा, गु़रूर न करो, और शरीरों से, कि सींग ऊँचा न करो।
5 ५ विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.
अपना सींग ऊँचा न करो, बग़ावत से बात न करो।
6 ६ विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.
क्यूँकि सरफ़राज़ी न तो पूरब से न पश्चिम से, और न दख्खिन से आती है;
7 ७ पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
बल्कि ख़ुदा ही 'अदालत करने वाला है; वह किसी को पस्त करता है और किसी को सरफ़राज़ी बख़्शता है।
8 ८ कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
क्यूँकि ख़ुदावन्द के हाथ में प्याला है, और मय झाग वाली है; वह मिली हुई शराब से भरा है, और ख़ुदावन्द उसी में से उंडेलता है; बेशक उसकी तलछट ज़मीन के सब शरीर निचोड़ निचोड़ कर पिएँगे।
9 ९ पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
लेकिन मैं तो हमेशा ज़िक्र करता रहूँगा, मैं या'क़ूब के ख़ुदा की मदहसराई करूँगा।
10 १० तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे उंच करीन.
और मैं शरीरों के सब सींग काट डालूँगा लेकिन सादिकों के सींग ऊँचे किए जाएंगे।