< स्तोत्रसंहिता 73 >
1 १ आसाफाचे स्तोत्र खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.
亚萨的诗。 神实在恩待以色列那些清心的人!
2 २ पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
至于我,我的脚几乎失闪; 我的脚险些滑跌。
3 ३ कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.
我见恶人和狂傲人享平安就心怀不平。
4 ४ कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.
他们死的时候没有疼痛; 他们的力气却也壮实。
5 ५ दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
他们不像别人受苦, 也不像别人遭灾。
6 ६ अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.
所以,骄傲如链子戴在他们的项上; 强暴像衣裳遮住他们的身体。
7 ७ अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.
他们的眼睛因体胖而凸出; 他们所得的,过于心里所想的。
8 ८ ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
他们讥笑人,凭恶意说欺压人的话; 他们说话自高。
9 ९ ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
他们的口亵渎上天; 他们的舌毁谤全地。
10 १० म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
所以 神的民归到这里, 喝尽了满杯的苦水。
11 ११ ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
他们说: 神怎能晓得? 至高者岂有知识呢?
12 १२ पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
看哪,这就是恶人; 他们既是常享安逸,财宝便加增。
13 १३ खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.
我实在徒然洁净了我的心, 徒然洗手表明无辜。
14 १४ कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.
因为,我终日遭灾难; 每早晨受惩治。
15 १५ जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता.
我若说,我要这样讲, 这就是以奸诈待你的众子。
16 १६ तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या.
我思索怎能明白这事, 眼看实系为难,
17 १७ मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला.
等我进了 神的圣所, 思想他们的结局。
18 १८ खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस.
你实在把他们安在滑地, 使他们掉在沉沦之中。
19 १९ कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.
他们转眼之间成了何等的荒凉! 他们被惊恐灭尽了。
20 २० जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.
人睡醒了,怎样看梦; 主啊,你醒了也必照样轻看他们的影像。
21 २१ कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो.
因而,我心里发酸, 肺腑被刺。
22 २२ मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.
我这样愚昧无知, 在你面前如畜类一般。
23 २३ तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे.
然而,我常与你同在; 你搀着我的右手。
24 २४ तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.
你要以你的训言引导我, 以后必接我到荣耀里。
25 २५ स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?
除你以外,在天上我有谁呢? 除你以外,在地上我也没有所爱慕的。
26 २६ माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे.
我的肉体和我的心肠衰残; 但 神是我心里的力量, 又是我的福分,直到永远。
27 २७ जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.
远离你的,必要死亡; 凡离弃你行邪淫的,你都灭绝了。
28 २८ पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
但我亲近 神是与我有益; 我以主耶和华为我的避难所, 好叫我述说你一切的作为。