< स्तोत्रसंहिता 71 >
1 १ हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
MAIN Ieowa, i liki komui, kom der mueid on, i en jarodi kokolata.
2 २ मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
Kom kotin dore ia la pweki omui pun, o kotin jauaja ia, o kotin kapaike don ia karon omui kan o jauaja ia.
3 ३ मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
Komui en koti wiala ia paipalap, waja i pan kak pitila ia anjau karoj, pwe kom kotin inauki on ia er, me kom pan dore ia la, pwe komui ai paip o ai kel.
4 ४ हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
Ai Kot, jauaja ia jan nan pa en me doo jan Kot, o jan nan pa en me japun o weit.
5 ५ कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
Pwe komui kapore pa i, Main Ieowa, komui ai kel jan ni ai pulepul.
6 ६ गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
I liki komui jan ni ai ipwidier, o komui me kaipwi ia jan nan kaped en in ai, i pan kapina komui kokolata.
7 ७ पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे.
Nai dueta meakot me kapuriamui on me toto; a komui kel pa i manaman.
8 ८ माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
Kom kotin kadireki au ai kapin o danke on komui.
9 ९ माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.
Kom der kotin kaje ia la ni ai mala, o der muei jan ia ni ai pan luetala.
10 १० कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.
Pwe ai imwintiti kin palian ia ni ar lokaia, o me kin majamajan ia, kin kapakapun pena,
11 ११ ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही.
O indinda: Kot muei janer i, komail paki o koledi i, pwe jota jauaj pa a.
12 १२ हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!
Main Kot, kom der kotin doo wei jan ia, Main Kot! Kom kotin madando o jauaja ia.
13 १३ जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक.
A me palian ia en namenokala o jarodi; o me rapa kin ia, pwen kame ia la, ren kadupale kidi namenok o lalaue.
14 १४ पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
A i pan auiauita, o i pan kalaudela ai kapin on komui kokolata.
15 १५ माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही.
Au ai en kaloki jili omui pun, o omui kamau pan ran karoj, me jota kak wadawad pena.
16 १६ प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन.
I kin weweid jili ni mana en Ieowa Kaun; i pan kapina omui pun eta.
17 १७ हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.
Main Kot, kom kotin padaki on ia er jan ni ai pulepul, o i kaloki jili omui manaman akan jan maj kokodo lel met.
18 १८ खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.
Main Kot, kom der kotin muei jan ia ni ai mala, pit en mon ai lao puetepuetala, lao i pan padaki on jeri en jeri kan omui wiawia o on me pan kokodo omui manaman.
19 १९ हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
Main Kot, omui pun meid ileile, kom kin wiada dodok lapalap. Main Kot, ij me rajon komui?
20 २० ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
Pwe komui kotiki on kit er kamajak laud o toto, o kom kotin pur on kamau kit ada o wai ia dado jan nan waja lol.
21 २१ तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
Komui pan kotin kaileile ia da, o kom pan kotin pur on kamait ia la.
22 २२ मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
I ap pan kapinaki komui kajan, pweki omui melel, ai Kot, I pan kauleki on komui arp, on komui, me Jaraui en Ijrael.
23 २३ मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
Kil in au ai o nen i, me re kotin dorelar, pan pereperen o kauli on komui.
24 २४ माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.
Pil lo i pan indinda duen omui pun jan manjan lel jautik. Pwe irail, me men kawe ia la, namenokala o jarodier.