< स्तोत्रसंहिता 70 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
Ein Psalm Davids, vorzusingen zum Gedächtnis. Eile, Gott, mich zu erretten, HERR, mir zu helfen!
2 जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
Es müssen sich schämen und zuschanden werden, die nach meiner Seele stehen; sie müssen zurückkehren und gehöhnet werden, die mir übels wünschen,
3 जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत.
daß sie müssen wiederum zu Schanden werden, die da über mich schreien: Da, da!
4 जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
Freuen und fröhlich müssen sein an dir, die nach dir fragen; und die dein Heil lieben, immer sagen: Hochgelobt sei Gott!
5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.

< स्तोत्रसंहिता 70 >