< स्तोत्रसंहिता 70 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
(Til Sangmesteren. Af David. Lehazkir.) Du værdiges, Gud, at fri mig, Herre, il mig til Hjælp!
2 २ जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
Lad dem beskæmmes og røme, som vil mig til Livs, og de, der ønsker mig ondt, lad dem vige med Skændsel;
3 ३ जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत.
lad dem stivne af Rædsel ved deres Skam, de, som siger: "Ha, ha!"
4 ४ जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
Lad alle, som søger dig, frydes og glædes i dig; lad dem, som elsker din Frelse, bestandig sige: "Gud er stor!"
5 ५ पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
Arm og fattig er jeg, il mig til Hjælp, o Gud! Du er min Hjælp og min Frelser; tøv ej, HERRE!