< स्तोत्रसंहिता 7 >
1 १ कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
【苦中投奔於主】 達味有感於本雅明族人的話,向上主唱流離之歌。 上主,我的天主!我一心投奔你;求你助我逃脫一切追逐我的人,求你救拔我;
2 २ नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
免得有人像獅子一般撕裂我時,無人搭救我。
3 ३ परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही.
上主!如果我真做了這事,我主!在我手中就真有罪!
4 ४ माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.
我若真加害過我的友好,或無故把我的仇敵劫掠;
5 ५ जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
就讓敵人追逐我,擒獲我,把我的性命踐踏在污地,將我的光榮歸諸於泥灰。
6 ६ हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
上主,求你震怒奮起,前來克制我仇的暴慢。我的天主,求你醒起助我,施行你定的斷案。
7 ७ राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.
願萬民聚齊環繞著你。願你回駕由高處鑒視。
8 ८ परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.
上主,萬民的審判者! 上主,請照我的正義,請按我的無罪,護衛我的權利。
9 ९ दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
公義的天主! 惟你洞察肺腑和人心,願惡人的毒害停止,求你堅固義人!
10 १० जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
天主是我的護盾,給心正的人助陣。
11 ११ देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
天主是公義的審判者,對怙惡的人終日怒嚇。
12 १२ जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
仇人雖然磨刀擦劍,開弓拉弦準備射箭;
13 १३ त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.
那只是為自己預備死亡的武器,為自己製造帶火的箭矢。
14 १४ त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
試看,他既孕惡懷毒,自然就要產生虛無,
15 १५ त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
他挖掘坑穴,擺布陷阱,勢必落在自備的窖中。
16 १६ त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.
他的兇惡必反轉到自己頭上,他的橫暴必降落在自己的頂上。
17 १७ मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
我要稱謝上主的公道,歌頌至高上主的名號。