< स्तोत्रसंहिता 69 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.
[Psalm lal David] Moliyula, O God; Tuh kof uh lapak sun inkwawuk.
2 २ मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.
Nga tili in acn furarrar na loal, Ac wangin acn nga in tu fac. Nga oasr in kof loallana, Ac noa uh apkuran in utiyuwi.
3 ३ माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.
Nga totola in tung; Kapinsrulyuk paola. Mutuk munasla Ke nga tupan kasru lom.
4 ४ विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.
Elos su srungayu ke wangin sripa Elos pus liki na aunsifuk. Mwet lokoalok luk fahk kas kikiap lainyu; Elos arulana fokoko ac kena in uniyuwi. Elos oru nga folokonang ma su nga tia pisrala.
5 ५ हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
O God, ma koluk luk tiana wikla liki kom, Kom etu lupan nikin luk.
6 ६ हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
Nikmet lela tuh nga in akmwekinyalos su lulalfongi kom, O LEUM GOD Kulana. Nikmet lela in nga pa pwanang pilesreyuk elos su alu nu sum, O God lun Israel.
7 ७ कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.
Ke sripom nga akkolukyeyuk, Ac mwekin apinyula.
8 ८ मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.
Nga oana sie mwet tia eteyuk sin mwet lik, Ac oana sie mwetsac in sou luk.
9 ९ कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.
Moniyuk luk nu ke Tempul lom firirrir in nga oana sie e; Ac kas in akkoluk lun mwet keim putati nu fuk.
10 १० जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
Nga sifacna akpusiselyeyu ke lalo luk, Ac mwet uh fahk kas in akkolukyeyu.
11 ११ जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.
Nga nokomang nuknuk in asor Ac elos isrunyu.
12 १२ जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.
Elos sramsramkinyu inkanek uh, Ac mwet sruhi elos kinala on keik.
13 १३ पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
A funu nga, LEUM GOD, nga ac pre nu sum; Topukyu, O God, in pacl kom sulela, Topukyu ke lungse yohk lom, Ke sripen kom akpwayeye wulela lom in molela.
14 १४ मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.
Moliyula tuh nga in tia tili yen furarrar, Langoeyula liki mwet lokoalok luk, Ac liki inkof loal.
15 १५ पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.
Tia lela sronot in afinyula, Nikmet lela nga in walomla yen loal Ku tili nu in kulyuk.
16 १६ हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
Topukyu, O LEUM GOD, ke wolana lun lungse kawil lom; Ke pakoten lom, kom in forma nu sik.
17 १७ आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.
Nikmet okanla motom liki mwet kulansap lom, Nga muta in ongoiya lulap — topukyu inge!
18 १८ माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.
Kaluku nu yuruk ac moliyula. Moliyula liki mwet lokoalok luk.
19 १९ तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
Kom etu lupan kas koluk lun mwet uh keik, Ac lupan akmwekin ac aklusrongten orek nu sik. Kom liye mwet lokoalok luk nukewa.
20 २० निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
Kas in akkoluk lalos kunausla insiuk, Ac nga muta in ongoiya. Nga finsrak mu ac oasr pakomuta nu sik, tuh pa wangin, Nga nunku mu ac oasr mwet tuku akwoyeyu, a wangin.
21 २१ त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली
Ke nga masrinsral, elos se pwasin, Ac ke nga malu, elos se vinegar nimuk.
22 २२ त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
Lela tepu lalos in ekla mwe kwasrip nu selos; Lela kufwa mutal lalos in mwe lusla nu selos.
23 २३ त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
Oru tuh mutalos in kunla, Ac oru tuh fintokolos in munas pacl e nukewa.
24 २४ तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
Okoaung mulat lom nu faclos; Ac lela kasrkusrak lom in ukwalos ac sruokolosi.
25 २५ त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
Lela iwen aktuktuk lalos in pisala, Ac in wangin mwet moul lula in lohm nuknuk selos.
26 २६ कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
Elos kalyaelos su kom kai, Ac elos kaskas ke keok lun mwet su kom kanteya.
27 २७ ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.
Kom in simusla ma koluk lalos nukewa, Ac tia lela elos in wi eis molela sum.
28 २८ जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
Lela tuh inelos in iyukla liki book in moul, Ac lela elos in tia wi sikyak inmasrlon mwet suwoswos lom.
29 २९ पण मी गरीब आणि दु: खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
A nga muta in keok ac ongoiya, Srukyuyak, O God, ac moliyula!
30 ३० मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
Nga ac fah kaksakin God ke soko on; Nga ac fah akkalemye fulat lal ke nga sang kulo nu sel.
31 ३१ ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
Ma inge mwe akinsewowoye LEUM GOD, yohk liki in kisakin cow, Aok, yohk liki kisakin cow mukul ma matula ac oasr koac kac.
32 ३२ लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.
Ke mwet su muta in ongoiya elos ac liye ma inge, elos ac engan; Ac fah mwe akkeye insien mwet su alu nu sin God.
33 ३३ कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
LEUM GOD El porongalos su muta in enenu Ac El tia mulkunulosla su muta in presin.
34 ३४ आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
Kaksakin God, kusrao ac faclu, Meoa ac ma nukewa loac.
35 ३५ कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
Tuh God El fah molela Jerusalem Ac sifil musaeak siti in Judah. Mwet lun God elos ac fah muta we, ac acn we ac fah ma lalos.
36 ३६ त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.
Tuh fwilin tulik nutin mwet kulansap lal fah usrui acn inge, Ac elos su lungse El, fah muta we.