< स्तोत्रसंहिता 68 >

1 दाविदाचे स्तोत्र देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.
達味詩歌,交與樂官。 願天主興起,使他的仇敵四散,願仇恨他的人,由他面前逃竄!
2 जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक; जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत.
願惡人在天主面前,滅亡消散,就像煙被風吹蠟被火化一般。
3 परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत; ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
義人要在天主面前踴躍歡樂,我們也要在愉快中加倍喜悅。
4 देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
請您們向天主歌唱,讚頌天主的聖名;
5 तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
為那乘車經過曠野者修平道路;祂的名叫雅威,應在他面前喜氣盈盈。
6 देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
天主常在自己的聖所居住;天主是孤兒的慈父;天主是寡婦的保護,
7 हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, जेव्हा तू रानातून चालत गेलास,
天主給無靠的人備妥房屋,引領被擄的人重獲自由;叛逆者仍在乾旱居留。
8 तेव्हा भूमी कापली; देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
天主,當您領導您的百姓出走,就在您踏入曠野的時候:
9 हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास; जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस.
大地在天主面前震動,高天也滴下細雨,西乃在天主,以色列天主前也顫慄不休。
10 १० तुझे लोक त्यामध्ये राहिले; हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले.
天主,您給您的產業降下甘霖,因而復蘇了疲倦的人民。
11 ११ परमेश्वराने आज्ञा दिली, आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते.
於是,您的羊群便在那裏安住,天主,以您的慈愛照顧了貧苦。
12 १२ सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
當上主一發出了斷語,婦女便結隊前來報喜:
13 १३ जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.
「領兵的君王已經逃走遠遁,家中的閨秀分得了戰利品。
14 १४ तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
正當您們在羊棧中尋夢,鴿子的翅翼塗上了白銀,翎毛閃爍著火紅的黃金,
15 १५ हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे.
當全能者驅逐列王的時間,飄飄的雪花落向匝耳孟山。
16 १६ देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
巴商山是巍峨的高山,巴商山是多峰的青山。
17 १७ देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
多峰的青山,您為何嫉視天主愛住的聖山?嫉視上主要永久居住的聖山?
18 १८ तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
天主的車輦盈千累萬,我主由西乃駕臨聖殿。
19 १९ प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
您帶領俘虜升上高天,接受眾人作為貢品,不願住在上主天主前的人,也當貢品。
20 २० आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
唯願上主受讚美!祂承擔了我們的重負,因祂是救助我們的天主。
21 २१ पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
我們的天主實在是拯救人的天主,上主天主使我們擺脫死亡的關口。
22 २२ परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
天主必要把他的頭顱擊穿,必要把固執於惡者的腦袋打爛。
23 २३ यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
我主說:「縱使他們逃至巴商,我也要把他們捉回來,縱使他們躲在海底,我也要把他們逮回來,
24 २४ हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
為使您在鮮血中洗滌您的腳,您的狗以舌頭舔食敵人的血。
25 २५ गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
天主,人都看見您的御輦,看見我主我王,光臨聖殿:
26 २६ मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
歌詠的人在前,奏樂的人在後,在中間還有一隊鳴鼓的少女。
27 २७ तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
您們應在盛會中讚美天主,以色列的子孫應讚美上主。
28 २८ तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
最幼小的本雅明領導在前,隨後有猶大的首領和隨員,則步隆和納斐塔里的長官。天主,求您顯示出您的威能,天主,顯出為我們行的大能。
29 २९ यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
為了您在耶路撒冷的聖殿,眾君王必要向您奉上祭獻,
30 ३० लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
懇求您怒叱蘆葦中的野獸,成群的公牛和列國的牛犢;願他們帶著銀塊前來降服,願您驅散喜愛戰爭的民族!
31 ३१ मिसरमधून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.
願有使臣由埃及來就,雇士向天主高舉雙手!
32 ३२ अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुतिगीते गा.
普世萬邦,請歌頌天主,請讚揚上主。
33 ३३ जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.
他自永遠就是駕御高天穹蒼的大主,聽!他的聲音發出,巨大的聲音已發出。
34 ३४ देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे वैभव आणि आकाशात त्याचे बल आहे.
您們應承認天主的大能!他的榮耀光照以色列人,他的神威已發現在天雲。
35 ३५ हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.
天主,以色列的天主,在聖所中顯得可敬可畏,他曾將力量和權能賜於百姓。 願天主永受讚美!

< स्तोत्रसंहिता 68 >