< स्तोत्रसंहिता 65 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.
Dāvida dziesma. Dziedātāju vadonim. Dievs, klusībā iekš Ciānas Tu topi slavēts, un solījumi Tev top maksāti.
2 २ जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.
Tu paklausi lūgšanas, visa miesa nāk pie Tevis.
3 ३ दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
Noziegumi mūs ir pārvarējuši, - mūsu pārkāpumus, tos Tu salīdzini!
4 ४ ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.
Svētīgs tas, ko Tu izredzi, un kam Tu vaļu dod pie Tevis nākt un dzīvot Tavos pagalmos; mēs tapsim paēdināti no Tava nama labuma Tavā svētā dzīvoklī.
5 ५ हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस.
Paklausi mūs pēc tās taisnības, kas brīnišķas lietas dara, ak Dievs, mūsu Pestītājs, Tu patvērums visām zemes robežām, un tiem, kas tālu pie jūras dzīvo.
6 ६ कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत.
Tu stiprini kalnus ar Savu spēku, Tu apjozies ar varu,
7 ७ तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो.
Tu klusini jūras kaukšanu, viņas viļņu kaukšanu un ļaužu troksni,
8 ८ जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस.
Ka tie, kas dzīvo tanīs robežās, bīstas no Tavām zīmēm. Tu iepriecini visu, kas kust, vakarā un rītā.
9 ९ तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.
Tu piemeklē zemi un to dzirdini un to dari ļoti bagātu. Dieva upīte ir ūdens pilna. Tu liec viņu labībai labi izdoties, jo tā Tu zemi apkopi.
10 १० तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस
Tu slacini viņas vagas, un liec lietum līt uz viņas arumiem; Tu tos dari mīkstus caur lāsēm, Tu svētī viņas asnus.
11 ११ तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.
Tu pušķo gadu ar Savu labumu, un Tavas pēdas pil no taukumiem.
12 १२ रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.
Tuksneša ganības pil un pakalni ar prieku ir apjozti.
13 १३ कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.
Lauki ir apģērbti ar ganāmiem pulkiem, un ielejas ar labību apklātas, ka gavilē un dzied.