< स्तोत्रसंहिता 64 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
To the chief Musician. A Psalm of David. Hear, O God, my voice in my plaint; preserve my life from fear of the enemy:
2 २ वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
Hide me from the secret counsel of evil-doers, from the tumultuous crowd of the workers of iniquity,
3 ३ त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.
Who have sharpened their tongue like a sword, [and] have aimed their arrow, a bitter word;
4 ४ याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;
That they may shoot in secret at the perfect: suddenly do they shoot at him, and fear not.
5 ५ ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
They encourage themselves in an evil matter, they concert to hide snares; they say, Who will see them?
6 ६ ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.
They devise iniquities: We have it ready, the plan is diligently sought out. And each one's inward [thought] and heart is deep.
7 ७ परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
But God will shoot an arrow at them: suddenly are they wounded;
8 ८ त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
By their own tongue they are made to fall over one another: all that see them shall flee away.
9 ९ सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
And all men shall fear, and shall declare God's doing; and they shall wisely consider his work.
10 १० परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.
The righteous shall rejoice in Jehovah, and trust in him; and all the upright in heart shall glory.