< स्तोत्रसंहिता 64 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
大衛的詩,交與伶長。 上帝啊,我哀歎的時候,求你聽我的聲音! 求你保護我的性命,不受仇敵的驚恐!
2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
求你把我隱藏, 使我脫離作惡之人的暗謀和作孽之人的擾亂。
3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.
他們磨舌如刀, 發出苦毒的言語,好像比準了的箭,
4 याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;
要在暗地射完全人; 他們忽然射他,並不懼怕。
5 ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
他們彼此勉勵設下惡計; 他們商量暗設網羅, 說:誰能看見?
6 ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.
他們圖謀奸惡, 說:我們是極力圖謀的。 他們各人的意念心思是深的。
7 परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
但上帝要射他們; 他們忽然被箭射傷。
8 त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
他們必然絆跌,被自己的舌頭所害; 凡看見他們的必都搖頭。
9 सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
眾人都要害怕, 要傳揚上帝的工作, 並且明白他的作為。
10 १० परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.
義人必因耶和華歡喜, 並要投靠他; 凡心裏正直的人都要誇口。

< स्तोत्रसंहिता 64 >