< स्तोत्रसंहिता 62 >
1 १ दाविदाचे स्तोत्र माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.
大卫的诗,照耶杜顿的作法,交与伶长。 我的心默默无声,专等候 神; 我的救恩是从他而来。
2 २ तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
惟独他是我的磐石,我的拯救; 他是我的高台,我必不很动摇。
3 ३ झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
你们大家攻击一人,把他毁坏, 如同毁坏歪斜的墙、将倒的壁,要到几时呢?
4 ४ त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
他们彼此商议,专要从他的尊位上把他推下; 他们喜爱谎话,口虽祝福,心却咒诅。 (细拉)
5 ५ हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
我的心哪,你当默默无声,专等候 神, 因为我的盼望是从他而来。
6 ६ तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
惟独他是我的磐石,我的拯救; 他是我的高台,我必不动摇。
7 ७ माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
我的拯救、我的荣耀都在乎 神; 我力量的磐石、我的避难所都在乎 神。
8 ८ अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे.
你们众民当时时倚靠他, 在他面前倾心吐意; 神是我们的避难所。 (细拉)
9 ९ खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
下流人真是虚空; 上流人也是虚假; 放在天平里就必浮起; 他们一共比空气还轻。
10 १० दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
不要仗势欺人, 也不要因抢夺而骄傲; 若财宝加增,不要放在心上。
11 ११ देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे.
神说了一次、两次,我都听见: 就是能力都属乎 神。
12 १२ हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.
主啊,慈爱也是属乎你, 因为你照着各人所行的报应他。