< स्तोत्रसंहिता 61 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
Přednímu z kantorů na neginot, Davidův. Slyš, ó Bože, volání mé, pozoruj modlitby mé.
2 २ जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
Od konce země v sevření srdce svého k tobě volám, na skálu nade mne vyšší uvediž mne.
3 ३ कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
Nebo jsi býval mé útočiště, a pevná věže před tváří nepřítele.
4 ४ मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
Buduť bydliti v stánku tvém na věky, schráním se v skrýši křídel tvých. (Sélah)
5 ५ कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
Ty jsi zajisté, Bože, vyslyšel žádosti mé, dal jsi dědictví bojícím se jména tvého.
6 ६ तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
Ke dnům krále více dnů přidej, ať jsou léta jeho od národu do pronárodu,
7 ७ मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
Ať bydlí na věky před tváří Boží; milosrdenství a pravdu nastroj, ať ho ostříhají.
8 ८ मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
A tak žalmy zpívati budu jménu tvému na věky, a sliby své plniti budu den po dni.