< स्तोत्रसंहिता 6 >
1 १ मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
聖歌隊の指揮者によってシェミニテにあわせ琴をもってうたわせたダビデの歌 主よ、あなたの怒りをもって、わたしを責めず、あなたの激しい怒りをもって、わたしを懲しめないでください。
2 २ हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
主よ、わたしをあわれんでください。わたしは弱り衰えています。主よ、わたしをいやしてください。わたしの骨は悩み苦しんでいます。
3 ३ माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
わたしの魂もまたいたく悩み苦しんでいます。主よ、あなたはいつまでお怒りになるのですか。
4 ४ हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
主よ、かえりみて、わたしの命をお救いください。あなたのいつくしみにより、わたしをお助けください。
5 ५ कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? (Sheol )
死においては、あなたを覚えるものはなく、陰府においては、だれがあなたをほめたたえることができましょうか。 (Sheol )
6 ६ मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
わたしは嘆きによって疲れ、夜ごとに涙をもって、わたしのふしどをただよわせ、わたしのしとねをぬらした。
7 ७ शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
わたしの目は憂いによって衰え、もろもろのあだのゆえに弱くなった。
8 ८ अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
すべて悪を行う者よ、わたしを離れ去れ。主はわたしの泣く声を聞かれた。
9 ९ परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
主はわたしの願いを聞かれた。主はわたしの祈をうけられる。
10 १० माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
わたしの敵は恥じて、いたく悩み苦しみ、彼らは退いて、たちどころに恥をうけるであろう。