< स्तोत्रसंहिता 59 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव; जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.
לַמְנַצֵּ֣חַ אַל־תַּשְׁחֵת֮ לְדָוִ֪ד מִ֫כְתָּ֥ם בִּשְׁלֹ֥חַ שָׁא֑וּל וַֽיִּשְׁמְר֥וּ אֶת־הַ֝בַּ֗יִת לַהֲמִיתֽוֹ׃ הַצִּילֵ֖נִי מֵאֹיְבַ֥י ׀ אֱלֹהָ֑י מִּמִתְקוֹמְמַ֥י תְּשַׂגְּבֵֽנִי׃
2 दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव, आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव.
הַ֭צִּילֵנִי מִפֹּ֣עֲלֵי אָ֑וֶן וּֽמֵאַנְשֵׁ֥י דָ֝מִ֗ים הוֹשִׁיעֵֽנִי׃
3 कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.
כִּ֤י הִנֵּ֪ה אָֽרְב֡וּ לְנַפְשִׁ֗י יָג֣וּרוּ עָלַ֣י עַזִ֑ים לֹא־פִשְׁעִ֖י וְלֹא־חַטָּאתִ֣י יְהוָֽה׃
4 जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत; मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा.
בְּֽלִי־עָ֭וֹן יְרוּצ֣וּן וְיִכּוֹנָ֑נוּ ע֖וּרָה לִקְרָאתִ֣י וּרְאֵה׃
5 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर; कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस.
וְאַתָּ֤ה יְהוָֽה־אֱלֹהִ֥ים ׀ צְבָא֡וֹת אֱלֹ֘הֵ֤י יִשְׂרָאֵ֗ל הָקִ֗יצָה לִפְקֹ֥ד כָּֽל־הַגּוֹיִ֑ם אַל־תָּחֹ֨ן כָּל־בֹּ֖גְדֵי אָ֣וֶן סֶֽלָה׃
6 संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात आणि नगराभोवती फिरतात.
יָשׁ֣וּבוּ לָ֭עֶרֶב יֶהֱמ֥וּ כַכָּ֗לֶב וִיס֥וֹבְבוּ עִֽיר׃
7 पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत. कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो?
הִנֵּ֤ה ׀ יַבִּ֘יע֤וּן בְּפִיהֶ֗ם חֲ֭רָבוֹת בְּשִׂפְתוֹתֵיהֶ֑ם כִּי־מִ֥י שֹׁמֵֽעַ׃
8 परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील.
וְאַתָּ֣ה יְ֭הוָה תִּשְׂחַק־לָ֑מוֹ תִּ֝לְעַ֗ג לְכָל־גּוֹיִֽם׃
9 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन; कारण देवच माझा उंच बुरूज आहे.
עֻ֭זּוֹ אֵלֶ֣יךָ אֶשְׁמֹ֑רָה כִּֽי־אֱ֝לֹהִ֗ים מִשְׂגַּבִּֽי׃
10 १० माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल; माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
אֱלֹהֵ֣י חַסְדִּ֣י יְקַדְּמֵ֑נִי אֱ֝לֹהִ֗ים יַרְאֵ֥נִי בְשֹׁרְרָֽי׃
11 ११ त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील; हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड.
אַל־תַּהַרְגֵ֤ם ׀ פֶּֽן־יִשְׁכְּח֬וּ עַמִּ֗י הֲנִיעֵ֣מוֹ בְ֭חֵילְךָ וְהוֹרִידֵ֑מוֹ מָֽגִנֵּ֣נוּ אֲדֹנָֽי׃
12 १२ कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द, आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.
חַטַּאת־פִּ֗ימוֹ דְּֽבַר־שְׂפָ֫תֵ֥ימוֹ וְיִלָּכְד֥וּ בִגְאוֹנָ֑ם וּמֵאָלָ֖ה וּמִכַּ֣חַשׁ יְסַפֵּֽרוּ׃
13 १३ क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर. देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहित होवो.
כַּלֵּ֥ה בְחֵמָה֮ כַּלֵּ֪ה וְֽאֵ֫ינֵ֥מוֹ וְֽיֵדְע֗וּ כִּֽי־אֱ֭לֹהִים מֹשֵׁ֣ל בְּיַעֲקֹ֑ב לְאַפְסֵ֖י הָאָ֣רֶץ סֶֽלָה׃
14 १४ संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात. आणि रात्री नगराभोवती फिरतात.
וְיָשׁ֣וּבוּ לָ֭עֶרֶב יֶהֱמ֥וּ כַכָּ֗לֶב וִיס֥וֹבְבוּ עִֽיר׃
15 १५ ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात, आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.
הֵ֭מָּה יְנִיע֣וּן לֶאֱכֹ֑ל אִם־לֹ֥א יִ֝שְׂבְּע֗וּ וַיָּלִֽינוּ׃
16 १६ परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
וַאֲנִ֤י ׀ אָשִׁ֣יר עֻזֶּךָ֮ וַאֲרַנֵּ֥ן לַבֹּ֗קֶר חַ֫סְדֶּ֥ךָ כִּֽי־הָיִ֣יתָ מִשְׂגָּ֣ב לִ֑י וּ֝מָנ֗וֹס בְּי֣וֹם צַר־לִֽי׃
17 १७ हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन; कारण देव माझा उंच बुरूज आहे, माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
עֻ֭זִּי אֵלֶ֣יךָ אֲזַמֵּ֑רָה כִּֽי־אֱלֹהִ֥ים מִ֝שְׂגַּבִּ֗י אֱלֹהֵ֥י חַסְדִּֽי׃

< स्तोत्रसंहिता 59 >