< स्तोत्रसंहिता 58 >
1 १ दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
Müzik şefi için - “Yok Etme” makamında Davut'un Miktamı Ey yöneticiler, gerçekten adil mi karar verirsiniz? Doğru mu yargılarsınız insanları?
2 २ नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
Hayır! Hep haksızlık tasarlarsınız içinizde, Zorbalık saçar elleriniz yeryüzüne.
3 ३ दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
Kötüler daha ana rahmindeyken yoldan çıkar, Doğdu doğalı yalan söyleyerek sapar.
4 ४ त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
Zehirleri yılan zehiri gibidir. Kulakları tıkalı bir kobrayı andırırlar,
5 ५ गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
Usta büyücülerin, Afsuncuların sesini duymak istemeyen bir kobrayı.
6 ६ हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
Ey Tanrı, kır onların ağzında dişlerini, Sök genç aslanların azı dişlerini, ya RAB!
7 ७ जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
Akıp giden su gibi yok olsunlar. Yaylarını gerince oklarının ucu kırılsın.
8 ८ गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
Süründükçe eriyen sümüklüböceğe dönsünler. Düşük çocuk gibi güneş yüzü görmesinler.
9 ९ तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
Kazanlarınız diken ateşini daha duymadan, Yaşı da kurusu da kasırgayla savrulacak kötülerin.
10 १० नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
Doğru adam alınan öcü görünce sevinecek Ve ayaklarını kötünün kanında yıkayacak.
11 ११ म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
O zaman insanlar, “Gerçekten doğrulara ödül var” diyecek, “Gerçekten dünyayı yargılayan bir Tanrı var.”