< स्तोत्रसंहिता 58 >

1 दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
Do ye indeed speak righteousness, O congregation? do ye judge uprightly, O ye sons of men?
2 नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
Yea, in heart ye work wickedness; ye weigh the violence of your hands in the earth.
3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
The wicked are estranged from the womb: they go astray as soon as they be born, speaking lies.
4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
Their poison is like the poison of a serpent: they are like the deaf adder that stoppeth her ear;
5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
Which will not hearken to the voice of charmers, charming never so wisely.
6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
Break their teeth, O Elohim, in their mouth: break out the great teeth of the young lions, O YHWH.
7 जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
Let them melt away as waters which run continually: when he bendeth his bow to shoot his arrows, let them be as cut in pieces.
8 गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
As a snail which melteth, let every one of them pass away: like the untimely birth of a woman, that they may not see the sun.
9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
Before your pots can feel the thorns, he shall take them away as with a whirlwind, both living, and in his wrath.
10 १० नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
The righteous shall rejoice when he seeth the vengeance: he shall wash his feet in the blood of the wicked.
11 ११ म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
So that a man shall say, Verily there is a reward for the righteous: verily he is an Elohim that judgeth in the earth.

< स्तोत्रसंहिता 58 >