< स्तोत्रसंहिता 57 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.
TO THE OVERSEER. “DO NOT DESTROY.” A MIKTAM OF DAVID, IN HIS FLEEING FROM THE FACE OF SAUL INTO A CAVE. Favor me, O God, favor me, For my soul is trusting in You, And I trust in the shadow of Your wings, Until the calamities pass over.
2 २ मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.
I call to God Most High, To God [who] is perfecting for me.
3 ३ तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
He sends from the heavens, and saves me, He reproached [the one] who is panting after me. (Selah) God sends forth His kindness and His truth.
4 ४ माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
My soul [is] in the midst of lions, I lie down [among] flames—sons of men, Their teeth [are] a spear and arrows, And their tongue a sharp sword.
5 ५ हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
Be exalted above the heavens, O God, Your glory above all the earth.
6 ६ त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
They have prepared a net for my steps, My soul has bowed down, They have dug a pit before me, They have fallen into its midst. (Selah)
7 ७ हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
My heart is prepared, O God, My heart is prepared, I sing and praise.
8 ८ हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन.
Awake, my glory, awake, stringed instrument and harp, I awake the morning dawn.
9 ९ हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.
I thank You among the peoples, O Lord, I praise You among the nations.
10 १० कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
For Your kindness [is] great to the heavens, And Your truth to the clouds.
11 ११ हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
Be exalted above the heavens, O God. Your glory above all the earth!