< स्तोत्रसंहिता 56 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.
In finem, Pro populo, qui a Sanctis longe factus est, David in tituli inscriptionem, cum tenuerunt eum Allophyli in Geth. Miserere mei Deus, quoniam conculcavit me homo: tota die impugnans tribulavit me.
2 २ माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.
Conculcaverunt me inimici mei tota die: quoniam multi bellantes adversum me.
3 ३ मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
Ab altitudine diei timebo: ego vero in te sperabo.
4 ४ मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?
In Deo laudabo sermones meos, in Deo speravi: non timebo quid faciat mihi caro.
5 ५ दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.
Tota die verba mea execrabantur: adversum me omnes cogitationes eorum, in malum.
6 ६ ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.
Inhabitabunt et abscondent: ipsi calcaneum meum observabunt. Sicut sustinuerunt animam meam,
7 ७ त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.
pro nihilo salvos facies illos: in ira populos confringes.
8 ८ तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
Deus, vitam meam annunciavi tibi: posuisti lacrymas meas in conspectu tuo, Sicut et in promissione tua:
9 ९ मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.
tunc convertentur inimici mei retrorsum: In quacumque die invocavero te: ecce cognovi quoniam Deus meus es.
10 १० मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
In Deo laudabo verbum, in Domino laudabo sermonem:
11 ११ मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
in Deo speravi, non timebo quid faciat mihi homo.
12 १२ हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.
In me sunt Deus vota tua, quæ reddam, laudationes tibi.
13 १३ कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.
Quoniam eripuisti animam meam de morte, et pedes meos de lapsu: ut placeam coram Deo in lumine viventium.