< स्तोत्रसंहिता 53 >

1 दाविदाचे स्तोत्र मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
לַמְנַצֵּחַ עַֽל־מָחֲלַת מַשְׂכִּיל לְדָוִֽד׃ אָמַר נָבָל בְּלִבּוֹ אֵין אֱלֹהִים הִֽשְׁחִיתוּ וְהִֽתְעִיבוּ עָוֶל אֵין עֹֽשֵׂה־טֽוֹב׃
2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.
אֱֽלֹהִים מִשָּׁמַיִם הִשְׁקִיף עַֽל־בְּנֵי־אָדָם לִרְאוֹת הֲיֵשׁ מַשְׂכִּיל דֹּרֵשׁ אֶת־אֱלֹהִֽים׃
3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
כֻּלּוֹ סָג יַחְדָּו נֶאֱלָחוּ אֵין עֹֽשֵׂה־טוֹב אֵין גַּם־אֶחָֽד׃
4 ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही.
הֲלֹא יָדְעוּ פֹּעֲלֵי אָוֶן אֹכְלֵי עַמִּי אָכְלוּ לֶחֶם אֱלֹהִים לֹא קָרָֽאוּ׃
5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
שָׁם ׀ פָּחֲדוּ פַחַד לֹא־הָיָה פָחַד כִּֽי־אֱלֹהִים פִּזַּר עַצְמוֹת חֹנָךְ הֱבִשֹׁתָה כִּֽי־אֱלֹהִים מְאָסָֽם׃
6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
מִי יִתֵּן מִצִּיּוֹן יְשֻׁעוֹת יִשְׂרָאֵל בְּשׁוּב אֱלֹהִים שְׁבוּת עַמּוֹ יָגֵל יַעֲקֹב יִשְׂמַח יִשְׂרָאֵֽל׃

< स्तोत्रसंहिता 53 >