< स्तोत्रसंहिता 53 >
1 १ दाविदाचे स्तोत्र मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
To the choirmaster on Mahalath a poem of David. He says a fool in heart his there not [is] a god they act corruptly and they act abominably unrighteousness there not [is one who] does good.
2 २ देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.
God from heaven he looks down on [the] children of humankind to see ¿ [is] there [one who] acts prudently [one who] seeks God.
3 ३ त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
All of it he turns back together they are corrupt there not [is one who] does good there not also [is] one.
4 ४ ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही.
¿ Not do they know [those who] do wickedness [those who] devour people my they eat bread God not they call on.
5 ५ तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
There - they feared a fear [which] not it was fear for God he has scattered [the] bones of [one who] encamped against you you have put [them] to shame for God he has rejected them.
6 ६ अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
Who? will he give [will be] from Zion [the] salvation of Israel when turns back God [the] captivity of people his let it be glad Jacob let it rejoice Israel.