< स्तोत्रसंहिता 51 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
Dāvida dziesma. Dziedātāju vadonim. Kad pravietis Nātans pie viņa nāca, kad viņš bija gājis pie Batsebas. Apžēlojies par mani, ak Dievs, pēc Savas žēlastības, izdeldē manus pārkāpumus pēc Savas lielās sirdsžēlastības!
2 २ देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
Mazgā mani labi no manas noziedzības un šķīstī mani no maniem grēkiem.
3 ३ कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
Jo es atzīstu savus pārkāpumus, un mani grēki ir manā priekšā vienmēr.
4 ४ तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
Tev vienam es esmu grēkojis un ļaunu darījis priekš Tavām acīm, ka Tu palieci taisns Savos vārdos un šķīsts Savā tiesā.
5 ५ पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
Redzi, noziedzībā esmu dzemdināts, un grēkos māte mani ieņēmusi.
6 ६ पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
Redzi, tev patīk sirds patiesība, tad dari man zināmu to apslēpto gudrību.
7 ७ मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
Šķīstī mani no grēkiem ar īzapu, ka topu šķīsts, mazgā mani, ka topu baltāks nekā sniegs.
8 ८ आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
Liec man dzirdēt prieku un līksmību, ka tie kauli līksmojās, ko Tu esi satriecis.
9 ९ माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
Apslēp Savu vaigu no maniem grēkiem un deldē visu manu noziegumu.
10 १० देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
Radi iekš manis, ak Dievs, šķīstu sirdi un atjauno iekš manis pastāvīgu garu.
11 ११ तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
Nemet mani nost no Sava vaiga, un neatņem no manis Savu Svēto Garu.
12 १२ तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
Atdod man atkal Savas pestīšanas prieku, un uzturi mani ar labprātīgu garu.
13 १३ तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
Tad es mācīšu pārkāpējiem Tavus ceļus, ka grēcinieki pie Tevis atgriežas.
14 १४ हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
Izglābi mani no asins vainām, ak Dievs, tu Dievs mans Pestītājs; tad mana mēle slavēs Tavu taisnību.
15 १५ प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
Kungs, atdari manas lūpas, tad mana mute izteiks Tavu slavu.
16 १६ कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
Jo Tev netīk upuris, citādi es to gribētu dot, dedzināms upuris Tev nepatīk.
17 १७ देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
Dieva upuris ir satriekts gars; salauztu un sagrauztu sirdi Tu, Dievs, nesmādēsi.
18 १८ हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
Dari labu Ciānai pēc Savas labprātības, uztaisi Jeruzālemes mūrus.
19 १९ तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.
Tad Tev patiks taisnības upuri, dedzināmais un visa(kopējais) sadedzināmais upuris, tad upurēs vēršus uz Tava altāra.