< स्तोत्रसंहिता 51 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
לַמְנַצֵּחַ מִזְמוֹר לְדָוִֽד׃ בְּֽבוֹא־אֵלָיו נָתָן הַנָּבִיא כַּאֲשֶׁר־בָּא אֶל־בַּת־שָֽׁבַע׃ חׇנֵּנִי אֱלֹהִים כְּחַסְדֶּךָ כְּרֹב רַחֲמֶיךָ מְחֵה פְשָׁעָֽי׃
2 देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
(הרבה) [הֶרֶב] כַּבְּסֵנִי מֵעֲוֺנִי וּֽמֵחַטָּאתִי טַהֲרֵֽנִי׃
3 कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
כִּֽי־פְשָׁעַי אֲנִי אֵדָע וְחַטָּאתִי נֶגְדִּי תָמִֽיד׃
4 तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
לְךָ לְבַדְּךָ ׀ חָטָאתִי וְהָרַע בְּעֵינֶיךָ עָשִׂיתִי לְמַעַן תִּצְדַּק בְּדׇבְרֶךָ תִּזְכֶּה בְשׇׁפְטֶֽךָ׃
5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
הֵן־בְּעָווֹן חוֹלָלְתִּי וּבְחֵטְא יֶחֱמַתְנִי אִמִּֽי׃
6 पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
הֵן־אֱמֶת חָפַצְתָּ בַטֻּחוֹת וּבְסָתֻם חׇכְמָה תוֹדִיעֵֽנִי׃
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
תְּחַטְּאֵנִי בְאֵזוֹב וְאֶטְהָר תְּכַבְּסֵנִי וּמִשֶּׁלֶג אַלְבִּֽין׃
8 आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
תַּשְׁמִיעֵנִי שָׂשׂוֹן וְשִׂמְחָה תָּגֵלְנָה עֲצָמוֹת דִּכִּֽיתָ׃
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
הַסְתֵּר פָּנֶיךָ מֵחֲטָאָי וְֽכׇל־עֲוֺנֹתַי מְחֵֽה׃
10 १० देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
לֵב טָהוֹר בְּרָא־לִי אֱלֹהִים וְרוּחַ נָכוֹן חַדֵּשׁ בְּקִרְבִּֽי׃
11 ११ तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
אַל־תַּשְׁלִיכֵנִי מִלְּפָנֶיךָ וְרוּחַ קׇדְשְׁךָ אַל־תִּקַּח מִמֶּֽנִּי׃
12 १२ तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
הָשִׁיבָה לִּי שְׂשׂוֹן יִשְׁעֶךָ וְרוּחַ נְדִיבָה תִסְמְכֵֽנִי׃
13 १३ तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
אֲלַמְּדָה פֹשְׁעִים דְּרָכֶיךָ וְחַטָּאִים אֵלֶיךָ יָשֽׁוּבוּ׃
14 १४ हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
הַצִּילֵנִי מִדָּמִים ׀ אֱֽלֹהִים אֱלֹהֵי תְשׁוּעָתִי תְּרַנֵּן לְשׁוֹנִי צִדְקָתֶֽךָ׃
15 १५ प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
אֲדֹנָי שְׂפָתַי תִּפְתָּח וּפִי יַגִּיד תְּהִלָּתֶֽךָ׃
16 १६ कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
כִּי ׀ לֹא־תַחְפֹּץ זֶבַח וְאֶתֵּנָה עוֹלָה לֹא תִרְצֶֽה׃
17 १७ देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
זִבְחֵי אֱלֹהִים רוּחַ נִשְׁבָּרָה לֵב־נִשְׁבָּר וְנִדְכֶּה אֱלֹהִים לֹא תִבְזֶֽה׃
18 १८ हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
הֵיטִיבָה בִרְצוֹנְךָ אֶת־צִיּוֹן תִּבְנֶה חוֹמוֹת יְרוּשָׁלָֽ͏ִם׃
19 १९ तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.
אָז תַּחְפֹּץ זִבְחֵי־צֶדֶק עוֹלָה וְכָלִיל אָז יַעֲלוּ עַל־מִזְבַּחֲךָ פָרִֽים׃

< स्तोत्रसंहिता 51 >