< स्तोत्रसंहिता 50 >

1 आसाफाचे स्तोत्र. थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
En salme av Asaf. Den Allmektige, Gud Herren, taler og kaller på jorden fra solens opgang til dens nedgang.
2 सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.
Fra Sion, skjønnhetens krone, stråler Gud frem.
3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
Vår Gud kommer og skal ikke tie; ild fortærer for hans åsyn, og omkring ham stormer det sterkt.
4 त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
Han kaller på himmelen der oppe og på jorden for å dømme sitt folk:
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
Samle til mig mine fromme, som har inngått pakt med mig om offer!
6 आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
Og himmelen kunngjør hans rettferdighet; for Gud er den som skal dømme. (Sela)
7 हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.
Hør, mitt folk, jeg vil tale, Israel, jeg vil vidne for dig: Gud, din Gud, er jeg.
8 मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
Ikke for dine offers skyld vil jeg straffe dig; dine brennoffer er alltid for mig.
9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
Jeg vil ikke ta okser fra ditt hus eller bukker fra dine hegn.
10 १० कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
For mig hører alle dyr i skogen til, dyrene på fjellene i tusentall.
11 ११ उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
Jeg kjenner alle fjellenes fugler, og det som rører sig på marken, står for mig.
12 १२ मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
Om jeg hungret, vilde jeg ikke si det til dig; for mig hører jorderike til og alt det som fyller det.
13 १३ मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
Mon jeg skulde ete oksers kjøtt og drikke bukkers blod?
14 १४ देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
Ofre Gud takksigelse og gi den Høieste det du har lovt,
15 १५ तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
og kall på mig på nødens dag, så vil jeg utfri dig, og du skal prise mig.
16 १६ देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
Men til den ugudelige sier Gud: Hvad har du med å fortelle om mine lover og føre min pakt i din munn?
17 १७ कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
Du hater jo tukt og kaster mine ord bak dig.
18 १८ तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
Når du ser en tyv, er du gjerne med ham, og med horkarler gjør du felles sak.
19 १९ तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
Din munn slipper du løs med ondt, og din tunge spinner sammen svik.
20 २० तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
Du sitter og taler imot din bror, du baktaler din mors sønn.
21 २१ तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
Dette har du gjort, og jeg har tidd; du tenkte jeg var som du; men jeg vil straffe dig og stille det frem for dine øine.
22 २२ तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
Legg merke til dette, I som glemmer Gud, forat jeg ikke skal sønderrive, og det er ingen som redder!
23 २३ जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
Den som ofrer takksigelse, ærer mig, og den som går den rette vei, ham vil jeg la skue Guds frelse.

< स्तोत्रसंहिता 50 >