< स्तोत्रसंहिता 5 >
1 १ मुख्य वाजंत्र्यासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. माझे कण्हणे विचारात घे.
TO THE OVERSEER. [BLOWN] INTO THE PIPES. A PSALM OF DAVID. Hear my sayings, O YHWH, Consider my (meditation)
2 २ माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे.
Be attentive to the voice of my cry, My King and my God, For I pray to You habitually.
3 ३ परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
YHWH, [in] the morning You hear my voice, [In] the morning I set in array for You, And I look out [expectantly].
4 ४ खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस.
For You [are] not a God desiring wickedness, Evil does not inhabit You.
5 ५ गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.
The boastful do not station themselves before Your eyes: You have hated all working iniquity.
6 ६ खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.
You destroy those speaking lies, YHWH detests a man of blood and deceit.
7 ७ पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन.
And I, in the abundance of Your kindness, I enter Your house, I bow myself toward Your holy temple in Your fear.
8 ८ हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.
O YHWH, lead me in Your righteousness, Because of those observing me, Make Your way straight before me,
9 ९ कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, ते आपल्या जीभेने आर्जव करतात.
For there is no stability in their mouth. Their heart [is] mischiefs, Their throat [is] an open grave, They make their tongue smooth.
10 १० देवा, त्यांना अपराधी घोषीत कर, त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे.
Declare them guilty, O God, Let them fall from their own counsels, In the abundance of their transgressions Drive them away, Because they have been rebellious against You.
11 ११ परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.
And all trusting in You rejoice, They sing for all time, and You cover them over, And those loving Your Name exult in You.
12 १२ कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस.
For You bless the righteous, O YHWH, Surrounding him with favor as a buckler!