< स्तोत्रसंहिता 48 >

1 कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
Pesem in psalm naslednikom Koretovim. Velik je Gospod in hvaljen silno, v mestu Boga našega, na gori svetosti svoje:
2 सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
V lepoti kraja, veselji vse zemlje, na gori Sijonski, na severni strani v mestu kralja vélikega.
3 देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
Bog v dvorih njegovih spoznava se za grad.
4 कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.
Ker, glej, sešli so se kralji, šli so vkup.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.
Sami so videli, vkup so strmeli, zmedli so se, izbežali urno.
6 भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
Trepet jih je obšel tam, bolečina kakor porodnico.
7 पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
Z burjo razbijaš ladije morske.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
Kakor smo slišali, tako smo videli v mestu Gospoda vojnih krdél, v mestu Boga našega; Bog ga utrjuje na veke.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
Milost tvojo premišljamo, o Bog, sredi tvojega svetišča.
10 १० देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
Kakor ime tvoje, tako je slava tvoja noter do krajev zemlje; pravice je polna desnica tvoja.
11 ११ तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.
Veselí se naj gora Sijonska, radujejo se hčere Judove zavoljo sodeb tvojih.
12 १२ सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
Obhajajte Sijon, in obdajajte ga; štejte stolpe njegove.
13 १३ उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
Upirajte misli svoje na trdnjavo, povzdignite oči k dvorom njegovim, da oznanjate prihodnjemu rodu.
14 १४ कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
Ker ta je naš Bog na vedno večne čase; ta nas bode vodil noter do smrti.

< स्तोत्रसंहिता 48 >