< स्तोत्रसंहिता 47 >

1 कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
伶長にうたはしめたるコラの子のうた もろもろのたみよ手をうち歓喜のこゑをあげ神にむかひてさけべ
2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
いとたかきヱホバはおそるべく また地をあまねく治しめず大なる王にてましませばなり
3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
ヱホバはもろもろの民をわれらに服はせ もろもろの國をわれらの足下にまつろはせたまふ
4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
又そのいつくしみたまふヤコブが譽とする嗣業をわれらのために選びたまはん (セラ)
5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
神はよろこびさけぶ聲とともにのぼり ヱホバはラッパの聲とともにのぼりたまへり
6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
ほめうたへ神をほめうたへ 頌歌へわれらの王をほめうたへ
7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
かみは地にあまねく王なればなり 教訓のうたをうたひてほめよ
8 देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
神はもろもろの國をすべをさめたまふ 神はそのきよき寳座にすわりたまふ
9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.
もろもろのたみの諸侯はつどひきたりてアブラハムの神の民となれり 他のもろもろの盾は神のものなり神はいとたふとし

< स्तोत्रसंहिता 47 >