< स्तोत्रसंहिता 47 >
1 १ कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
可拉後裔的詩,交與伶長。 萬民哪,你們都要拍掌! 要用誇勝的聲音向上帝呼喊!
2 २ कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
因為耶和華至高者是可畏的; 他是治理全地的大君王。
3 ३ तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
他叫萬民服在我們以下, 又叫列邦服在我們腳下。
4 ४ त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
他為我們選擇產業, 就是他所愛之雅各的榮耀。 (細拉)
5 ५ जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
上帝上升,有喊聲相送; 耶和華上升,有角聲相送。
6 ६ देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
你們要向上帝歌頌,歌頌! 向我們王歌頌,歌頌!
7 ७ कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
因為上帝是全地的王; 你們要用悟性歌頌。
8 ८ देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
上帝作王治理萬國; 上帝坐在他的聖寶座上。
9 ९ अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.
列邦的君王聚集要作亞伯拉罕之上帝的民。 因為世界的盾牌是屬上帝的; 他為至高!