< स्तोत्रसंहिता 46 >

1 मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे. देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
可拉後裔的詩歌,交與伶長。調用女音。 上帝是我們的避難所,是我們的力量, 是我們在患難中隨時的幫助。
2 म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
所以,地雖改變, 山雖搖動到海心,
3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
其中的水雖匉訇翻騰, 山雖因海漲而戰抖, 我們也不害怕。 (細拉)
4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.
有一道河,這河的分汊使上帝的城歡喜; 這城就是至高者居住的聖所。
5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.
上帝在其中,城必不動搖; 到天一亮,上帝必幫助這城。
6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
外邦喧嚷,列國動搖; 上帝發聲,地便鎔化。
7 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
萬軍之耶和華與我們同在; 雅各的上帝是我們的避難所! (細拉)
8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
你們來看耶和華的作為, 看他使地怎樣荒涼。
9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो.
他止息刀兵,直到地極; 他折弓、斷槍,把戰車焚燒在火中。
10 १० शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
你們要休息,要知道我是上帝! 我必在外邦中被尊崇,在遍地上也被尊崇。
11 ११ सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
萬軍之耶和華與我們同在; 雅各的上帝是我們的避難所!

< स्तोत्रसंहिता 46 >