< स्तोत्रसंहिता 45 >

1 मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे शोशन्नीम (म्हणजे भूकमले) या नावाच्या रागावर बसवलेले मस्कील (शिक्षण) प्रीतीचे स्तोत्र. माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.
לַמְנַצֵּ֣חַ עַל־שֹׁ֭שַׁנִּים לִבְנֵי־קֹ֑רַח מַ֝שְׂכִּ֗יל שִׁ֣יר יְדִידֹֽת׃ רָ֘חַ֤שׁ לִבִּ֨י ׀ דָּ֘בָ֤ר ט֗וֹב אֹמֵ֣ר אָ֭נִי מַעֲשַׂ֣י לְמֶ֑לֶךְ לְ֝שׁוֹנִ֗י עֵ֤ט ׀ סוֹפֵ֬ר מָהִֽיר׃
2 तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.
יָפְיָפִ֡יתָ מִבְּנֵ֬י אָדָ֗ם ה֣וּצַק חֵ֭ן בְּשְׂפְתוֹתֶ֑יךָ עַל־כֵּ֤ן בֵּֽרַכְךָ֖ אֱלֹהִ֣ים לְעוֹלָֽם׃
3 हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.
חֲגֽוֹר־חַרְבְּךָ֣ עַל־יָרֵ֣ךְ גִּבּ֑וֹר ה֝וֹדְךָ֗ וַהֲדָרֶֽךָ׃
4 तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल.
וַהֲדָ֬רְךָ֨ ׀ צְלַ֬ח רְכַ֗ב עַֽל־דְּבַר־אֱ֭מֶת וְעַנְוָה־צֶ֑דֶק וְתוֹרְךָ֖ נוֹרָא֣וֹת יְמִינֶֽךָ׃
5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.
חִצֶּ֗יךָ שְׁנ֫וּנִ֥ים עַ֭מִּים תַּחְתֶּ֣יךָ יִפְּל֑וּ בְּ֝לֵ֗ב אוֹיְבֵ֥י הַמֶּֽלֶךְ׃
6 देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
כִּסְאֲךָ֣ אֱ֭לֹהִים עוֹלָ֣ם וָעֶ֑ד שֵׁ֥בֶט מִ֝ישֹׁ֗ר שֵׁ֣בֶט מַלְכוּתֶֽךָ׃
7 तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
אָהַ֣בְתָּ צֶּדֶק֮ וַתִּשְׂנָ֫א רֶ֥שַׁע עַל־כֵּ֤ן ׀ מְשָׁחֲךָ֡ אֱלֹהִ֣ים אֱ֭לֹהֶיךָ שֶׁ֥מֶן שָׂשׂ֗וֹן מֵֽחֲבֵרֶֽיךָ׃
8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.
מֹר־וַאֲהָל֣וֹת קְ֭צִיעוֹת כָּל־בִּגְדֹתֶ֑יךָ מִֽן־הֵ֥יכְלֵי שֵׁ֝֗ן מִנִּ֥י שִׂמְּחֽוּךָ׃
9 राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे.
בְּנ֣וֹת מְ֭לָכִים בְּיִקְּרוֹתֶ֑יךָ נִצְּבָ֥ה שֵׁגַ֥ל לִֽ֝ימִינְךָ֗ בְּכֶ֣תֶם אוֹפִֽיר׃
10 १० मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
שִׁמְעִי־בַ֣ת וּ֭רְאִי וְהַטִּ֣י אָזְנֵ֑ךְ וְשִׁכְחִ֥י עַ֝מֵּ֗ךְ וּבֵ֥ית אָבִֽיךְ׃
11 ११ अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
וְיִתְאָ֣ו הַמֶּ֣לֶךְ יָפְיֵ֑ךְ כִּי־ה֥וּא אֲ֝דֹנַ֗יִךְ וְהִשְׁתַּֽחֲוִי־לֽוֹ׃
12 १२ सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
וּבַֽת־צֹ֨ר ׀ בְּ֭מִנְחָה פָּנַ֥יִךְ יְחַלּ֗וּ עֲשִׁ֣ירֵי עָֽם׃
13 १३ राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
כָּל־כְּבוּדָּ֣ה בַת־מֶ֣לֶךְ פְּנִ֑ימָה מִֽמִּשְׁבְּצ֖וֹת זָהָ֣ב לְבוּשָֽׁהּ׃
14 १४ तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
לִרְקָמוֹת֮ תּוּבַ֪ל לַ֫מֶּ֥לֶךְ בְּתוּל֣וֹת אַ֭חֲרֶיהָ רֵעוֹתֶ֑יהָ מ֖וּבָא֣וֹת לָֽךְ׃
15 १५ ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
תּ֭וּבַלְנָה בִּשְׂמָחֹ֣ת וָגִ֑יל תְּ֝בֹאֶ֗ינָה בְּהֵ֣יכַל מֶֽלֶךְ׃
16 १६ तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील.
תַּ֣חַת אֲ֭בֹתֶיךָ יִהְי֣וּ בָנֶ֑יךָ תְּשִׁיתֵ֥מוֹ לְ֝שָׂרִ֗ים בְּכָל־הָאָֽרֶץ׃
17 १७ तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.
אַזְכִּ֣ירָה שִׁ֭מְךָ בְּכָל־דֹּ֣ר וָדֹ֑ר עַל־כֵּ֥ן עַמִּ֥ים יְ֝הוֹדֻ֗ךָ לְעֹלָ֥ם וָעֶֽד׃

< स्तोत्रसंहिता 45 >