< स्तोत्रसंहिता 44 >
1 १ मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण) हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.
In finem, Filiis Core ad intellectum.
2 २ तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकांस स्थापिले, तू लोकांस पीडले परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.
Deus auribus nostris audivimus: patres nostri annunciaverunt nobis. Opus, quod operatus es in diebus eorum: et in diebus antiquis.
3 ३ कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
Manus tua gentes disperdidit, et plantasti eos: afflixisti populos, et expulisti eos:
4 ४ देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.
Nec enim in gladio suo possederunt terram, et brachium eorum non salvavit eos: Sed dextera tua, et brachium tuum, et illuminatio vultus tui: quoniam complacuisti in eis.
5 ५ तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.
Tu es ipse rex meus et Deus meus: qui mandas salutes Iacob.
6 ६ कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल.
In te inimicos nostros ventilabimus cornu, et in nomine tuo spernemus insurgentes in nobis.
7 ७ परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
Non enim in arcu meo sperabo: et gladius meus non salvabit me.
8 ८ देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)
Salvasti enim nos de affligentibus nos: et odientes nos confudisti.
9 ९ परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.
In Deo laudabimur tota die: et in nomine tuo confitebimur in sæculum.
10 १० तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.
Nunc autem repulisti et confudisti nos: et non egredieris Deus in virtutibus nostris.
11 ११ तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.
Avertisti nos retrorsum post inimicos nostros: et qui oderunt nos, diripiebant sibi.
12 १२ तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही.
Dedisti nos tamquam oves escarum: et in gentibus dispersisti nos.
13 १३ तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे.
Vendidisti populum tuum sine pretio: et non fuit multitudo in commutationibus eorum.
14 १४ राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.
Posuisti nos opprobrium vicinis nostris, subsannationem et derisum his, qui sunt in circuitu nostro.
15 १५ सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.
Posuisti nos in similitudinem Gentibus: commotionem capitis in populis.
16 १६ कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे.
Tota die verecundia mea contra me est, et confusio faciei meæ cooperuit me.
17 १७ हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही.
A voce exprobrantis, et obloquentis: a facie inimici, et persequentis.
18 १८ आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस.
Hæc omnia venerunt super nos, nec obliti sumus te: et inique non egimus in testamento tuo.
19 १९ तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस.
Et non recessit retro cor nostrum: et declinasti semitas nostras a via tua:
20 २० जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील,
Quoniam humiliasti nos in loco afflictionis, et cooperuit nos umbra mortis.
21 २१ तर देव हे शोधून काढणार नाही काय? कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो.
Si obliti sumus nomen Dei nostri, et si expandimus manus nostras ad deum alienum:
22 २२ खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
Nonne Deus requiret ista? ipse enim novit abscondita cordis. Quoniam propter te mortificamur tota die: æstimati sumus sicut oves occisionis.
23 २३ प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.
Exurge, quare obdormis Domine? exurge, et ne repellas in finem.
24 २४ तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु: ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?
Quare faciem tuam avertis, oblivisceris inopiæ nostræ et tribulationis nostræ?
25 २५ कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे.
Quoniam humiliata est in pulvere anima nostra: conglutinatus est in terra venter noster.
26 २६ आमच्या साहाय्याला ऊठ! आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.
Exurge Domine, adiuva nos: et redime nos propter nomen tuum.