< स्तोत्रसंहिता 43 >
1 १ हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड,
神よ、わたしをさばき、神を恐れない民にむかって、わたしの訴えをあげつらい、たばかりをなすよこしまな人からわたしを助け出してください。
2 २ कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?
あなたはわたしの寄り頼む神です。なぜわたしを捨てられたのですか。なぜわたしは敵のしえたげによって悲しみ歩くのですか。
3 ३ तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.
あなたの光とまこととを送ってわたしを導き、あなたの聖なる山と、あなたの住まわれる所にわたしをいたらせてください。
4 ४ तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.
その時わたしは神の祭壇へ行き、わたしの大きな喜びである神へ行きます。神よ、わが神よ、わたしは琴をもってあなたをほめたたえます。
5 ५ हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? आतल्या आत तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव त्याची मी आणखी स्तुती करेन.
わが魂よ、何ゆえうなだれるのか。何ゆえわたしのうちに思いみだれるのか。神を待ち望め。わたしはなおわが助け、わが神なる主をほめたたえるであろう。