< स्तोत्रसंहिता 41 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
Blago onome koji razumije ništemu! Gospod æe ga izbaviti u zli dan.
2 २ परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
Gospod æe ga saèuvati i poživiæe ga; biæe blažen na zemlji. Neæeš ga dati na volju neprijateljima njegovijem.
3 ३ तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
Gospod æe ga ukrijepiti bolna na odru. Sasvijem mijenjaš postelju njegovu u bolesti njegovoj.
4 ४ मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
Ja vièem: Gospode! smiluj se na me, iscijeli dušu moju, sagriješih ti.
5 ५ माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
Neprijatelji moji govore zlobno za mene: “kad æe umrijeti, i ime njegovo poginuti?”
6 ६ माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
I ako ko doðe da me vidi, laska; srce njegovo slaže u sebi nepravdu, i otišavši kazuje.
7 ७ माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
Šapæu o meni meðu sobom neprijatelji moji, i misle mi zlo:
8 ८ ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
“Zla stvar doðe na njega, legao je; neæe više ustati.”
9 ९ माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
I èovjek mira mojega, u kojega se uzdah, koji jeðaše hljeb moj, podiže na me petu.
10 १० परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
Ali ti, Gospode, smiluj se na me, i podigni me; a ja æu im vratiti.
11 ११ माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
Po tome æu poznati da sam ti mio, ako se ne uzraduje neprijatelj moj nada mnom.
12 १२ मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
A mene cijela saèuvaj, i daj mi da stojim pred licem tvojim dovijeka.
13 १३ परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन.
Blagosloven Bog Izrailjev od vijeka do vijeka. Amin, amin.