< स्तोत्रसंहिता 41 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
大卫的诗,交与伶长。 眷顾贫穷的有福了! 他遭难的日子,耶和华必搭救他。
2 परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
耶和华必保全他,使他存活; 他必在地上享福。 求你不要把他交给仇敌,遂其所愿。
3 तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
他病重在榻,耶和华必扶持他; 他在病中,你必给他铺床。
4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
我曾说:耶和华啊,求你怜恤我,医治我! 因为我得罪了你。
5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
我的仇敌用恶言议论我说: 他几时死,他的名才灭亡呢?
6 माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
他来看我就说假话; 他心存奸恶,走到外边才说出来。
7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
一切恨我的,都交头接耳地议论我; 他们设计要害我。
8 ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
他们说:有怪病贴在他身上; 他已躺卧,必不能再起来。
9 माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
连我知己的朋友, 我所倚靠、吃过我饭的也用脚踢我。
10 १० परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
耶和华啊,求你怜恤我, 使我起来,好报复他们!
11 ११ माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
因我的仇敌不得向我夸胜, 我从此便知道你喜爱我。
12 १२ मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
你因我纯正就扶持我, 使我永远站在你的面前。
13 १३ परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन.
耶和华—以色列的 神是应当称颂的, 从亘古直到永远。阿们!阿们!

< स्तोत्रसंहिता 41 >