< स्तोत्रसंहिता 40 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
לַמְנַצֵּחַ לְדָוִד מִזְמֽוֹר׃ קַוֺּה קִוִּיתִי יְהֹוָה וַיֵּט אֵלַי וַיִּשְׁמַע שַׁוְעָתִֽי׃
2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
וַיַּעֲלֵנִי ׀ מִבּוֹר שָׁאוֹן מִטִּיט הַיָּוֵן וַיָּקֶם עַל־סֶלַע רַגְלַי כּוֹנֵן אֲשֻׁרָֽי׃
3 आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
וַיִּתֵּן בְּפִי ׀ שִׁיר חָדָשׁ תְּהִלָּה לֵאלֹהֵינוּ יִרְאוּ רַבִּים וְיִירָאוּ וְיִבְטְחוּ בַּיהֹוָֽה׃
4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
אַשְֽׁרֵי הַגֶּבֶר אֲשֶׁר־שָׂם יְהֹוָה מִבְטַחוֹ וְֽלֹא־פָנָה אֶל־רְהָבִים וְשָׂטֵי כָזָֽב׃
5 परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.
רַבּוֹת עָשִׂיתָ ׀ אַתָּה ׀ יְהֹוָה אֱלֹהַי נִפְלְאֹתֶיךָ וּמַחְשְׁבֹתֶיךָ אֵלֵינוּ אֵין ׀ עֲרֹךְ אֵלֶיךָ אַגִּידָה וַאֲדַבֵּרָה עָצְמוּ מִסַּפֵּֽר׃
6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
זֶבַח וּמִנְחָה ׀ לֹֽא־חָפַצְתָּ אׇזְנַיִם כָּרִיתָ לִּי עוֹלָה וַחֲטָאָה לֹא שָׁאָֽלְתָּ׃
7 म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
אָז אָמַרְתִּי הִנֵּה־בָאתִי בִּמְגִלַּת־סֵפֶר כָּתוּב עָלָֽי׃
8 माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
לַעֲשׂוֹת־רְצוֹנְךָ אֱלֹהַי חָפָצְתִּי וְתוֹרָתְךָ בְּתוֹךְ מֵעָֽי׃
9 मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.
בִּשַּׂרְתִּי צֶדֶק ׀ בְּקָהָל רָב הִנֵּה שְׂפָתַי לֹא אֶכְלָא יְהֹוָה אַתָּה יָדָֽעְתָּ׃
10 १० तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
צִדְקָתְךָ לֹֽא־כִסִּיתִי ׀ בְּתוֹךְ לִבִּי אֱמוּנָתְךָ וּתְשׁוּעָתְךָ אָמָרְתִּי לֹא־כִחַדְתִּי חַסְדְּךָ וַאֲמִתְּךָ לְקָהָל רָֽב׃
11 ११ यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
אַתָּה יְהֹוָה לֹֽא־תִכְלָא רַחֲמֶיךָ מִמֶּנִּי חַסְדְּךָ וַאֲמִתְּךָ תָּמִיד יִצְּרֽוּנִי׃
12 १२ कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.
כִּי אָפְפֽוּ־עָלַי ׀ רָעוֹת עַד־אֵין מִסְפָּר הִשִּׂיגוּנִי עֲוֺנֹתַי וְלֹא־יָכֹלְתִּי לִרְאוֹת עָצְמוּ מִשַּׂעֲרוֹת רֹאשִׁי וְלִבִּי עֲזָבָֽנִי׃
13 १३ परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
רְצֵה יְהֹוָה לְהַצִּילֵנִי יְהֹוָה לְעֶזְרָתִי חֽוּשָׁה׃
14 १४ जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.
יֵבֹשׁוּ וְיַחְפְּרוּ ׀ יַחַד מְבַקְשֵׁי נַפְשִׁי לִסְפּוֹתָהּ יִסֹּגוּ אָחוֹר וְיִכָּלְמוּ חֲפֵצֵי רָעָתִֽי׃
15 १५ हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.
יָשֹׁמּוּ עַל־עֵקֶב בׇּשְׁתָּם הָאֹמְרִים לִי הֶאָח ׀ הֶאָֽח׃
16 १६ परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
יָשִׂישׂוּ וְיִשְׂמְחוּ ׀ בְּךָ כׇּֽל־מְבַקְשֶׁיךָ יֹאמְרוּ תָמִיד יִגְדַּל יְהֹוָה אֹהֲבֵי תְּשׁוּעָתֶֽךָ׃
17 १७ मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस.
וַאֲנִי ׀ עָנִי וְאֶבְיוֹן אֲדֹנָי יַחֲשׇׁב ־ לִי עֶזְרָתִי וּמְפַלְטִי אַתָּה אֱלֹהַי אַל־תְּאַחַֽר׃

< स्तोत्रसंहिता 40 >