< स्तोत्रसंहिता 40 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
(Til sangmesteren. Af David. En salme.) Jeg biede troligt på Herren, han bøjede sig til mig, og hørte mit Skrig.
2 २ त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
Han drog mig op af den brusende Grav, af det skidne Dynd, han satte min Fod på en Klippe, gav Skridtene Fasthed,
3 ३ आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
en ny Sang lagde han i min Mund, en Lovsang til vor Gud. Mange skal se det og frygte og stole på HERREN.
4 ४ जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
Salig den Mand, der sætter sin Lid til HERREN, ej vender sig til hovmodige eller dem, der hælder til Løgn.
5 ५ परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.
Mange Undere gjorde du, HERRE min Gud, og mange Tanker tænkte du for os; de kan ikke opregnes for dig; ellers forkyndte og fortalte jeg dem; til at tælles er de for mange.
6 ६ यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
Til Slagt- og Afgrødeoffer har du ej Lyst, du gav mig åbne Ører, Brænd- og Syndoffer kræver du ikke.
7 ७ म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
Da sagde jeg: "Se, jeg kommer, i Bogrullen er der givet mig Forskrift;
8 ८ माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
at gøre din Vilje, min Gud, er min Lyst, og din Lov er i mit Indre."
9 ९ मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.
I en stor Forsamling forkyndte jeg Retfærd, se, mine Læber lukked jeg ikke; HERRE, du ved det.
10 १० तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
Din Retfærd dulgte jeg ej i mit Hjerte, din Trofasthed og Frelse talte jeg Om, din Nåde og Sandhed fornægted jeg ej i en stor Forsamling.
11 ११ यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
Du, HERRE, vil ikke lukke dit Hjerte for mig, din Nåde og Sandhed skal altid være mit Værn.
12 १२ कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.
Thi Ulykker lejrer sig om mig i talløs Mængde, mine Synder har indhentet mig, så jeg ikke kan se, de er flere end Hovedets Hår, og Modet har svigtet.
13 १३ परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
Du værdiges, HERRE, at fri mig, HERRE, il mig til Hjælp.
14 १४ जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.
Lad dem beskæmmes og rødme, som vil mig til Livs, og de, der ønsker mig ondt, lad dem vige med Skændsel;
15 १५ हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.
Lad dem stivne af Rædsel ved deres Skam, de, som siger: "Ha, ha!" til mig!
16 १६ परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
Lad alle, som søger dig, frydes og glædes i dig; lad dem, som elsker din Frelse, bestandig sige: "HERREN er stor!"
17 १७ मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस.
Er jeg end arm og fattig, vil Herren dog tænke på mig. Du er min Hjælp og min Frelser; tøv ej, min Gud!