< स्तोत्रसंहिता 4 >
1 १ प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र. मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
大卫的诗,交与伶长。用丝弦的乐器。 显我为义的 神啊, 我呼吁的时候,求你应允我! 我在困苦中,你曾使我宽广; 现在求你怜恤我,听我的祷告!
2 २ अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
你们这上流人哪,你们将我的尊荣变为羞辱要到几时呢? 你们喜爱虚妄,寻找虚假,要到几时呢? (细拉)
3 ३ परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
你们要知道,耶和华已经分别虔诚人归他自己; 我求告耶和华,他必听我。
4 ४ भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
你们应当畏惧,不可犯罪; 在床上的时候,要心里思想,并要肃静。 (细拉)
5 ५ न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
当献上公义的祭, 又当倚靠耶和华。
6 ६ बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
有许多人说:谁能指示我们什么好处? 耶和华啊,求你仰起脸来,光照我们。
7 ७ त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
你使我心里快乐, 胜过那丰收五谷新酒的人。
8 ८ मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
我必安然躺下睡觉, 因为独有你—耶和华使我安然居住。