< स्तोत्रसंहिता 39 >

1 मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र. मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”
Au maître de chant, à Idithun. Chant de David. Je disais: " Je veillerai sur mes voies, de peur de pécher par la langue; je mettrai un frein à ma bouche, tant que le méchant sera devant moi. "
2 मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या.
Et je suis resté muet, dans le silence; je me suis tu, quoique privé de tout bien. Mais ma douleur s'est irritée,
3 माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो.
mon cœur s'est embrasé au-dedans de moi; dans mes réflexions un feu s'est allumé, et la parole est venue sur ma langue.
4 हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
Fais-moi connaître, Yahweh, quel est le terme de ma vie; quelle est la mesure de mes jours; que je sache combien je suis périssable.
5 पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
Tu as donné à mes jours la largeur de la main, et ma vie est comme un rien devant toi. Oui, tout homme vivant n'est qu'un souffle. — Séla.
6 खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
Oui, l'homme passe comme une ombre; oui, c'est en vain qu'il s'agite; il amasse, et il ignore qui recueillera.
7 हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
Maintenant, que puis-je attendre, Seigneur? Mon espérance est en toi.
8 माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
Délivre-moi de toutes mes transgressions; ne me rends pas l'opprobre de l'insensé.
9 मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
Je me tais, je n'ouvre plus la bouche, car c'est toi qui agis.
10 १० मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
Détourne de moi tes coups; sous la rigueur de ta main, je succombe!
11 ११ जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
Quand tu châties l'homme, en le punissant de son iniquité, tu détruis, comme fait la teigne, ce qu'il a de plus cher. Oui, tout homme n'est qu'un souffle. — Séla.
12 १२ परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
Ecoute ma prière, Yahweh, prête l'oreille à mes cris, ne sois pas insensible à mes larmes! Car je suis un étranger chez toi, un voyageur, comme tous mes pères.
13 १३ तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.
Détourne de moi le regard et laisse-moi respirer, avant que je m'en aille et que je ne sois plus!

< स्तोत्रसंहिता 39 >