< स्तोत्रसंहिता 39 >
1 १ मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र. मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”
To the Chief Musician. For Jeduthun. A Melody of David. I said, [to myself, ] I will take heed to my ways, That I sin not with my tongue, —I will put on my mouth a muzzle, So long as the lawless is before me.
2 २ मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या.
I was dumb with silence, I held my peace, afar from happiness, But, my pain had been stirred:
3 ३ माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो.
Hot was my heart within me, While I was musing, there was kindled a fire, I spake with my tongue!
4 ४ हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
Let me know, O Yahweh, mine end, And the measure of my days—what it is, I would know how short-lived I am.
5 ५ पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
Lo! as hand-breadths, hast thou granted my days, and my life-time, is as nothing before thee, —Surely, a mere breath, are all men, [even] such as stand firm. (Selah)
6 ६ खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
Surely as a shadow, doth every man wander, Surely in vain, do they bustle about, he heapeth things up, and knoweth not who shall gather them in.
7 ७ हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
Now, therefore, for what have I waited, O My Lord? My hope, is, in thee.
8 ८ माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
From all my transgressions, rescue thou me, —The reproach of the base, oh do not make me!
9 ९ मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
I am dumb, I cannot open my mouth, for, thou, hast done it.
10 १० मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
Remove from off me thy stroke, Because of the hostility of thy hand, am, I, consumed.
11 ११ जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
When, by rebukes for iniquity, thou hast corrected a man, Then hast thou consumed, as a moth, all that was delightful within him, Surely, a breath, are all men. (Selah)
12 १२ परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
Hear my prayer, O Yahweh, And, unto my cry for help, give ear, At my tears, do not be silent, —For, a sojourner, am, I, with thee, A stranger, like all my fathers.
13 १३ तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.
Look away from me that I may brighten up, Ere yet I depart and am no more.