< स्तोत्रसंहिता 38 >

1 आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
Yahwe, usinikemee katika hasira yako; usiniadhibu katika ghadhabu yako.
2 कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
Kwa kuwa mishale yako hunichoma, na mkono wako huniangusha chini.
3 माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
Mwili wangu wote unaumwa kwa sababu ya hasira yako; kwa sababu ya dhambi zangu mifupa yangu haina afya.
4 कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
Kwa maana maovu yangu yamenielemea; yamekuwa mzigo mzito kwangu.
5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
Vidonda vyangu vimeoza na vinanuka kwa sababu ya upumbavu wa dhambi zangu.
6 मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
Nimepindika na kuwa mnyonge kila siku; ninaenenda katika maombolezo siku zote.
7 कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
Kwa maana ndani yangu, ninaungua; hakuna afya katika mwili wangu.
8 मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
Nimedhohofika na kulemewa sana; ninaugua kwa sababu ya dhiki yangu.
9 हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
Bwana, wewe unaielewa shauku ya ndani kabisa ya moyo wangu, na kuugua kwangu hakujifichika kwako.
10 १० माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
Moyo wangu unapwita pwita, nguvu zangu zinaniisha, macho yangu yanafifia.
11 ११ माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
Marafiki na ndugu zangu wamenitenga kwa sababu ya hali; majirani zangu hukaa mbali nami.
12 १२ जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.
Wale wanaoutafuta uhai wangu hutega mitego kwa ajili yangu. Wao ambao hutafuta kunidhuru huongea maneno ya uharibifu na husema maneno ya uongo siku nzima.
13 १३ मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
Lakini, niko kama mtu kiziwi na sisikii lolote; niko kama mtu bubu ambaye hasemi lolote.
14 १४ ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
Niko kama mtu asiye sikia na mbaye hawezi kujibu.
15 १५ परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
Hakika ninakungoja wewe, Yahwe; wewe utanijibu, Bwana Mungu wangu.
16 १६ कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
Ninasema hivi ili kwamba maadui zangu wasije wakafurahia juu yangu. Ikiwa mguu wangu utateleza, watanifanyia mambo mabaya.
17 १७ कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.
Kwa kuwa niko karibu mashakani, na niko katika maumivu ya mara kwa mara.
18 १८ मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
Ninatubu makosa yangu; ninahuzunika kwa dhambi zangu.
19 १९ परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
Lakini maadui zangu ni wengi; wale wanichukiao ni wengi.
20 २० माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
Wao wananilipa mabaya kwa mema; wanavurumiza shutuma kwangu ingawa nimefuata lililo jema.
21 २१ हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
Usinitelekeze, Yahwe, Mungu wangu, usikae mbali nami.
22 २२ हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.
Njoo haraka unisaidie, Bwana, wokovu wangu.

< स्तोत्रसंहिता 38 >