< स्तोत्रसंहिता 38 >
1 १ आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
Psalm Davidov za spomin. Gospod, v srdu svojem ne dólži me, in v togoti svoji ne pokôri me.
2 २ कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
Ker pušice tvoje so zasajene v mé, in nadme si spustil roko svojo.
3 ३ माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
Nič celega ni na mesu mojem zavoljo srdú tvojega; mirú ni v mojih kostéh zavoljo greha mojega.
4 ४ कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
Ker krivice moje presezajo glavo mojo, kakor težko breme; pretežke so, da bi jih prenašati mogel.
5 ५ माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
Segnjile so in usmradile se bule moje, zavoljo nespameti moje.
6 ६ मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
Mučim se, krivim se presilno, ves dan pohajam v črni obleki.
7 ७ कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
Ker drob moj je poln prisada, tako da ni nič celega na mesu mojem.
8 ८ मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
Oslabljen sem in potrt presilno; tulim od stokanja svojega srca.
9 ९ हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
Gospod, pred teboj je vse hrepenenje moje; in zdihovanje ni ti skrito.
10 १० माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
Srce moje utriplje, zapušča me moja krepost, in luč mojih očî, tudi one niso v moji oblasti.
11 ११ माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
Prijátelji moji in bližnji moji stojé nadlogi moji nasproti, in sorodniki moji stojé od daleč.
12 १२ जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.
Stavijo pa zanke, kateri iščejo duše moje: in kateri iščejo hudega meni, govoré nadloge in izmišljajo ves dan zvijače.
13 १३ मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
Jaz pa jih ne slišim kakor gluh, in kakor nem ne odprem svojih ust.
14 १४ ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
Ampak sem kakor ón, ki ne sliši, in kateremu ní dokazov v ustih.
15 १५ परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
Ker tebe čakam, Gospod; da me ti uslišiš, Gospod, Bog moj.
16 १६ कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
Ker pravim: Naj se ne radujejo nad menoj; ko omahuje noga moja, naj se ne povzdigujejo proti meni,
17 १७ कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.
Ako bodem jaz za omahnenje pripravljen, in bolečina moja bode vedno pred mano.
18 १८ मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
Ker krivico svojo oznanjam, skrbi me moj greh.
19 १९ परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
Neprijatelji pa moji krepčajo se živi, in množijo se, kateri me sovražijo iz krivih vzrokov.
20 २० माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
In vračajoč hudo za dobro nasprotujejo mi, zato ker hodim za dobrim.
21 २१ हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
Ne zapústi me, Gospod, Bog moj; ne bivaj daleč od mene.
22 २२ हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.
Hiti na pomoč mojo, Gospod, blaginja moja!