< स्तोत्रसंहिता 37 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
Psalmus ipsi David. Noli æmulari in malignantibus: neque zelaveris facientes iniquitatem.
2 २ कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
Quoniam tamquam fœnum velociter arescent: et quemadmodum olera herbarum cito decident.
3 ३ परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
Spera in Domino, et fac bonitatem: et inhabita terram, et pasceris in divitiis eius.
4 ४ परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
Delectare in Domino: et dabit tibi petitiones cordis tui.
5 ५ तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
Revela Domino viam tuam, et spera in eo: et ipse faciet.
6 ६ तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
Et educet quasi lumen iustitiam tuam: et iudicium tuum tamquam meridiem:
7 ७ परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
subditus esto Domino, et ora eum. Noli æmulari in eo, qui prosperatur in via sua: in homine faciente iniustitias.
8 ८ रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
Desine ab ira, et derelinque furorem: noli æmulari ut maligneris.
9 ९ कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
Quoniam qui malignantur, exterminabuntur: sustinentes autem Dominum, ipsi hereditabunt terram.
10 १० थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
Et adhuc pusillum, et non erit peccator: et quæres locum eius, et non invenies.
11 ११ परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
Mansueti autem hereditabunt terram, et delectabuntur in multitudine pacis.
12 १२ दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
Observabit peccator iustum: et stridebit super eum dentibus suis.
13 १३ प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
Dominus autem irridebit eum: quoniam prospicit quod veniet dies eius.
14 १४ जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
Gladium evaginaverunt peccatores: intenderunt arcum suum. Ut deiiciant pauperem et inopem: ut trucident rectos corde.
15 १५ परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
Gladius eorum intret in corda ipsorum: et arcus eorum confringatur.
16 १६ अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
Melius est modicum iusto, super divitias peccatorum multas.
17 १७ कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
Quoniam brachia peccatorum conterentur: confirmat autem iustos Dominus.
18 १८ परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
Novit Dominus dies immaculatorum: et hereditas eorum in æternum erit.
19 १९ वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
Non confundentur in tempore malo, et in diebus famis saturabuntur:
20 २० परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
quia peccatores peribunt. Inimici vero Domini mox ut honorificati fuerint et exaltati: deficientes, quemadmodum fumus deficient.
21 २१ दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
Mutuabitur peccator, et non solvet: iustus autem miseretur et tribuet.
22 २२ जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
Quia benedicentes ei hereditabunt terram: maledicentes autem ei disperibunt.
23 २३ मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
Apud Dominum gressus hominis dirigentur: et viam eius volet.
24 २४ जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
Cum ceciderit, non collidetur: quia Dominus supponit manum suam.
25 २५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
Iunior fui, etenim senui: et non vidi iustum derelictum, nec semen eius quærens panem.
26 २६ सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
Tota die miseretur et commodat: et semen illius in benedictione erit.
27 २७ वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
Declina a malo, et fac bonum: et inhabita in sæculum sæculi.
28 २८ कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
Quia Dominus amat iudicium, et non derelinquet sanctos suos: in æternum conservabuntur. Iniusti punientur: et semen impiorum peribit.
29 २९ नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
Iusti autem hereditabunt terram: et inhabitabunt in sæculum sæculi super eam.
30 ३० नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
Os iusti meditabitur sapientiam, et lingua eius loquetur iudicium.
31 ३१ त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
Lex Dei eius in corde ipsius: et non supplantabuntur gressus eius.
32 ३२ परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
Considerat peccator iustum: et quærit mortificare eum.
33 ३३ परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
Dominus autem non derelinquet eum in manibus eius: nec damnabit eum cum iudicabitur illi.
34 ३४ परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
Expecta Dominum, et custodi viam eius: et exaltabit te ut hereditate capias terram: cum perierint peccatores videbis.
35 ३५ मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
Vidi impium superexaltatum, et elevatum sicut cedros Libani.
36 ३६ परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
Et transivi, et ecce non erat: et quæsivi eum, et non est inventus locus eius.
37 ३७ प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
Custodi innocentiam, et vide æquitatem: quoniam sunt reliquiæ homini pacifico.
38 ३८ पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
Iniusti autem disperibunt simul: reliquiæ impiorum interibunt.
39 ३९ नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
Salus autem iustorum a Domino: et protector eorum in tempore tribulationis.
40 ४० परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.
Et adiuvabit eos Dominus, et liberabit eos: et eruet eos a peccatoribus, et salvabit eos: quia speraverunt in eo.