< स्तोत्रसंहिता 36 >

1 प्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
Dicho de la rebelión del impío en medio de mi corazón: No hay temor de Dios delante de sus ojos.
2 त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो.
Por tanto se lisonjea en sus ojos para hallar su iniquidad, para aborrecerla.
3 त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.
Las palabras de su boca son iniquidad y fraude; no quiso entender para hacer bien.
4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही.
Iniquidad piensa sobre su cama; está sobre camino no bueno, no aborrece el mal.
5 हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.
Jehová, hasta los cielos es tu misericordia; tu verdad hasta las nubes.
6 परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.
Tu justicia como los montes de Dios, tus juicios abismo grande; al hombre y al animal conservas, o! Jehová.
7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
¡Cuán ilustre es tu misericordia, o, Dios! y los hijos de Adam se abrigan en la sombra de tus alas.
8 ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
Embriagarse han de la grosura de tu casa: y del arroyo de tus delicias los abrevarás.
9 कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
Porque contigo está el manadero de la vida; en tu lumbre veremos lumbre.
10 १० राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे.
Extiende tu misericordia a los que te conocen; y tu justicia a los rectos de corazón.
11 ११ गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. दुष्टाचा हात मला घालवून न देवो.
No venga contra mí pie de soberbia; y mano de impíos no me mueva.
12 १२ तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.
Allí cayeron los obradores de iniquidad; fueron rempujados, y no pudieron levantarse.

< स्तोत्रसंहिता 36 >