< स्तोत्रसंहिता 35 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.
大卫的诗。 耶和华啊,与我相争的,求你与他们相争! 与我相战的,求你与他们相战!
2 २ तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर.
拿着大小的盾牌, 起来帮助我。
3 ३ जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे.
抽出枪来,挡住那追赶我的; 求你对我的灵魂说:我是拯救你的。
4 ४ जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.
愿那寻索我命的,蒙羞受辱! 愿那谋害我的,退后羞愧!
5 ५ ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो.
愿他们像风前的糠, 有耶和华的使者赶逐他们。
6 ६ त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
愿他们的道路又暗又滑, 有耶和华的使者追赶他们。
7 ७ विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
因他们无故地为我暗设网罗, 无故地挖坑,要害我的性命。
8 ८ त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत.
愿灾祸忽然临到他身上! 愿他暗设的网缠住自己! 愿他落在其中遭灾祸!
9 ९ परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन.
我的心必靠耶和华快乐, 靠他的救恩高兴。
10 १० माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.
我的骨头都要说: 耶和华啊,谁能像你 救护困苦人脱离那比他强壮的, 救护困苦穷乏人脱离那抢夺他的?
11 ११ अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.
凶恶的见证人起来, 盘问我所不知道的事。
12 १२ माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु: खी आहे.
他们向我以恶报善, 使我的灵魂孤苦。
13 १३ परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
至于我,当他们有病的时候, 我便穿麻衣,禁食,刻苦己心; 我所求的都归到自己的怀中。
14 १४ मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
我这样行,好像他是我的朋友,我的弟兄; 我屈身悲哀,如同人为母亲哀痛。
15 १५ परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
我在患难中,他们却欢喜,大家聚集。 我所不认识的那些下流人聚集攻击我; 他们不住地把我撕裂。
16 १६ आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
他们如同席上好嬉笑的狂妄人向我咬牙。
17 १७ परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
主啊,你看着不理要到几时呢? 求你救我的灵魂脱离他们的残害! 救我的生命脱离少壮狮子!
18 १८ मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
我在大会中要称谢你, 在众民中要赞美你。
19 १९ माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
求你不容那无理与我为仇的向我夸耀! 不容那无故恨我的向我挤眼!
20 २० कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
因为他们不说和平话, 倒想出诡诈的言语害地上的安静人。
21 २१ ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.
他们大大张口攻击我,说: 阿哈,阿哈,我们的眼已经看见了!
22 २२ हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको.
耶和华啊,你已经看见了,求你不要闭口! 主啊,求你不要远离我!
23 २३ हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ.
我的 神我的主啊,求你奋兴醒起, 判清我的事,伸明我的冤!
24 २४ परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ.
耶和华—我的 神啊,求你按你的公义判断我, 不容他们向我夸耀!
25 २५ “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
不容他们心里说:阿哈,遂我们的心愿了! 不容他们说:我们已经把他吞了!
26 २६ जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.
愿那喜欢我遭难的一同抱愧蒙羞! 愿那向我妄自尊大的披惭愧,蒙羞辱!
27 २७ जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत.
愿那喜悦我冤屈得伸的欢呼快乐; 愿他们常说:当尊耶和华为大! 耶和华喜悦他的仆人平安。
28 २८ तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
我的舌头要终日论说你的公义, 时常赞美你。