< स्तोत्रसंहिता 34 >

1 दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
Ob vseh časih bom blagoslavljal Gospoda, njegova hvala bo nenehno na mojih ustih.
2 मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
Moja duša bo storila svoje bahanje v Gospodu. Ponižni bodo o tem slišali in bodo veseli.
3 तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
Oh poveličujte z menoj Gospoda in skupaj poveličujmo njegovo ime.
4 मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
Iskal sem Gospoda in me je uslišal ter me osvobodil pred vsemi mojimi strahovi.
5 जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
Pogledali so k njemu in bili ožarjeni in njihovi obrazi niso bili osramočeni.
6 या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
Ta revež je zajokal in Gospod ga je uslišal ter ga rešil pred vsemi njegovimi težavami.
7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
Gospodov angel tabori okoli teh, ki se ga bojijo in jih osvobaja.
8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
Oh okusite in vidite, da je Gospod dober. Blagoslovljen je človek, ki zaupa vanj.
9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
Oh bojte se Gospoda, vi njegovi sveti, kajti nič ne manjka tem, ki se ga bojijo.
10 १० तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
Mladim levom primanjkuje in trpijo lakoto, toda tistim, ki iščejo Gospoda, ne bo manjkala nobena dobra stvar.
11 ११ मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
Pridite, otroci, prisluhnite mi. Strahu Gospodovega vas bom učil.
12 १२ सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
Kakšen človek je tisti, ki želi življenje in ljubi mnoge dneve, da bi lahko videl dobro?
13 १३ तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
Zadržuj svoj jezik pred zlom in svoje ustnice od govorjenja zvijače.
14 १४ वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
Odidi od zla in delaj dobro, išči mir in ga zasleduj.
15 १५ परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
Gospodove oči so na pravičnih in njegova ušesa so odprta k njihovemu klicanju.
16 १६ परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
Gospodovo obličje je zoper te, ki delajo zlo, da z zemlje iztrebi spomin na njih.
17 १७ नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
Pravični kličejo in Gospod uslišuje ter jih osvobaja iz vseh njihovih stisk.
18 १८ जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
Gospod je blizu tem, ki so zlomljenega srca in rešuje takšne, ki so skesanega duha.
19 १९ नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
Mnoge so stiske pravičnega, toda Gospod ga osvobaja iz njih vseh.
20 २० परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
Varuje vse njegove kosti niti ena izmed njih ni zlomljena.
21 २१ परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
Zlo bo pokončalo zlobnega in tisti, ki sovražijo pravične, bodo zapuščeni.
22 २२ परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.
Gospod odkupuje dušo svojih služabnikov in nobeden od teh, ki zaupajo vanj, ne bo zapuščen.

< स्तोत्रसंहिता 34 >